agriculture news in marathi, farmers waiting for heavy rain, jalgaon, maharashtra | Agrowon

पावसाअभावी जळगावमधील १३ तालुके कोरडेच
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जून 2018

पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. काही भागात पाऊस व काही भागात कोरड अशी स्थिती आहे. जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
- प्रमोद पाटील, शेतकरी, यावल, जि. जळगाव.

जळगाव : जिल्ह्यात रविवारी (ता. १७) काही भागांत पाऊस झाला; परंतु १३ तालुक्‍यांमध्ये पावसाचा थेंबही नव्हता. त्यामुळे जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

रविवारी दुपारी कडक ऊन पडले. शेतात कापसात तण नियंत्रण, आंतरमशागत, केळी बागांमध्ये तण नियंत्रण, खते देण्याची कामे सुरू होती. त्यातच सायंकाळी ४.४० च्या सुमारास काळे ढग दाटून आले. जळगाव तालुक्‍यातील शिरसोली, सावखेडा बुद्रुक, मोहाडी, कंडारी भागात पाऊस झाला.  सुमारे २० ते २२ मिनिटे पाऊस होता. रात्री कोठेही पाऊस झाला नाही. नशिराबाद, भादली भागात तुरळक पाऊस पडला. जळगाव तालुक्‍याच्या उत्तर, पूर्व पट्ट्यात मात्र पाऊस झाला नाही. धरणगाव तालुक्‍यातील बांभोरी, टाकरखेडा, भोकणी भागात पाऊस झाला.

परंतु पश्‍चिम व उत्तर धरणगावातही पाऊस नव्हता. इतर १३ तालुक्‍यांमध्ये पावसाअभावी कोरड कायम आहे. पाचोरा, भडगाव, एरंडोल भागात पेरण्या झाल्या आहेत. पण पाऊस नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. या भागात पावसाची नितांत गरज आहे. पावसाअभावी पिके कोमेजण्याच्या स्थितीत आहेत. पाऊस जसजसा लांबत आहे, तशी जिल्ह्यातील पश्‍चिम, दक्षिण भागातील पाणीटंचाईदेखील वाढली आहे. शेतकरी वरुणराजाची आळवणी करू लागले आहेत.

जूनच्या सुरवातीला पूर्वमोसमी पाऊस झाला. परंतु हा पाऊस फक्त जळगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, पाचोरा, भडगाव भागात होता. यावल, भुसावळ भागात हा पाऊस नव्हता. या भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सोमवारी (ता. १८) सकाळीच ऊन पडले. अधूनमधून पांढरे ढग आकाशात येत होते.
 

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...