नाशिकमध्ये जूनचा पंधरवडा कोरडाच

पावसाची प्रतिक्षा
पावसाची प्रतिक्षा

नाशिक : यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक होती. गतवर्षाच्या तुलनेत यंदा प्रचंड प्रमाणात उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. मात्र, पावसाने अद्याप निराशा केली असून, मागील वर्षी १७ जूनपर्यंत १४५ मिमीपर्यंत पाऊस झाला होता; यंदा मात्र आतापर्यंत केवळ ४३ मिमी इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. चालू महिन्याचे दोन्ही आठवडे कोरडे गेले. यावर्षी पावसाच्या हंगामाचा निराशाजनक प्रारंभ झाला आहे. यावर्षी वरुणराजाचे जोरदार आगमन होईल, असा अंदाज उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेकांकडून बांधला जात होता; मात्र यंदा मान्सूनपूर्व पावसानेही दडी मारली.

उत्तर महाराष्ट्रात मॉन्सूनचा प्रवेश दोन दिवसांपूर्वी झाला असला तरी अद्याप पाहिजे तशी दमदार हजेरी पावसाने लावलेली नाही. यामुळे यंदा जूनमध्ये पावसाने नाशिककरांची निराशाच केली. आठवडाभरापेक्षा अधिक दिवस शहर व परिसरात वाऱ्याचा वेग प्रचंड प्रमाणात वाढल्याचे चित्र होते. यामुळे पावसावर त्याचा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. यापुढे वरुणराजाची कृपादृष्टी होईल आणि समाधानकारक असा पाऊस शहरासह जिल्ह्यात नाशिककरांना अनुभवयास येईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे. मॉन्सूनचा जिल्ह्यात प्रवेश झाल्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत.

२०१६ मध्येदेखील पावसाने दडी मारली होती. १९ जूनला पहिल्या पावसाची हजेरी नाशिककरांनी अनुभवली होती. त्या वेळी ८ मिमी इतका पाऊस एका दिवसात झाला होता. २०१५ मध्ये जून महिन्याच्या पंधरवड्यात पर्जन्यमानाची स्थिती जेमतेम राहिली होती. ३२ मिमीपर्यंत पाऊस त्यावेळी पंधरवड्यात झाला होता.

मागील वर्षाचा अपवाद वगळता जूनचा पंधरवडा सलग २०१५ पासून कोरडाच गेल्याची स्थिती आकडेवाडीवरून स्पष्ट होते. कारण, गेल्या वर्षी पंधरवड्यातच पर्जन्यमानाचे प्रमाण जवळपास दीडशे मिमीपर्यंत पोहचले होते. यावर्षी अद्याप पावसाने निराशाच केली असून, नाशिककरांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अखेरच्या आठवड्यापर्यंत पावसाची सलग हजेरी सुरू होईल, अशी आशा नाशिक भागातील शेतकरी बाळगून आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com