agriculture news in marathi, farmers waiting for rain, nagar, maharashtra | Agrowon

पाऊस येईना; नगरमधील शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 जुलै 2018

नगर  : पावसाला यंदा दमदार सुरवात झाली खरी; परंतु सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप पेरण्या, कापूस लागवड खोळंबली आहे. आतापर्यंत सरासरी २२ टक्के पेरणी झालेली असून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागती की काय अशी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे पेरणी, कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे.

नगर  : पावसाला यंदा दमदार सुरवात झाली खरी; परंतु सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप पेरण्या, कापूस लागवड खोळंबली आहे. आतापर्यंत सरासरी २२ टक्के पेरणी झालेली असून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागती की काय अशी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे पेरणी, कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे.

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी चार लाख २४ हजार ४९६ हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यात बाजरीचे सर्वाधिक १ लाख ६० हजार १८७ हेक्‍टर क्षेत्र असून एक लाख दोन हजार हेक्‍टर कापसाचे क्षेत्र आहे. मक्‍याचे ४२ हजार तर मुगाचे १९ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत बऱ्यापैकी पेरण्या, कापूस लागवड उरकली होती. यावर्षी पावसाळा सुरू होऊन जवळपास २५ दिवसांचा कालावधी झाला असला तरी अजूनही बऱ्याच भागात चांगला पाऊस झालेला नाही. त्यामुळे सरासरी २२ टक्के पेरणी झालेली आहे.

जामखेड वगळता अन्य तालुक्‍यांत पेरणीची स्थिती अल्प आहे. मागील आठवड्यात दोन दिवस चांगला पाऊस झाला आणि लगेच बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी, कापूस लागवड केली. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाला. आता पाऊस गायब होऊन सहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्याचा परिणाम पेरणी, उगवणीवर तर होत आहेच, पण लवकर पाऊस आला नाही तर पेरलेले उगवणार नाही आणि दुबार पेरणीचे संकट येईल अशी शेतकऱ्यांना भीती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यामधील अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात दरवर्षी जोरदार पाऊस असतो. त्यामुळे १५ ऑगस्टच्या आत भंडारदरा धरण भललेले असते. यंदा मात्र दोन दिवसांचा अपवाद वगळला तर अजूनही त्या भागात पाऊस नाही. पाऊस नसल्याने भातलागवडीवर परिणाम होण्याची शक्‍यता आदिवासी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यामध्ये सुरवातीच्या काळात चांगला पाऊस झाला तर उडीद, मुगाची सर्वाधिक पेरणी होत असते. गतवर्षी आणि दोन वर्षांपूर्वीही सुरवातीला आलेल्या पावसामुळे मूग, उडीदाचे क्षेत्र वाढले होते. यंदा मात्र दोन्ही पिकांच्या पेरणीचा कालावधी संपला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत क्षेत्र घटणार हे स्पष्ट झाले आहे. सरासरी एवढीही पेरणी होण्याची शक्‍यता नाही, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...