agriculture news in marathi, farmers waiting for study tour, pune, maharashtra | Agrowon

परदेश अभ्यास दौऱ्यासाठी पुणे जिल्ह्यातील ४८६ शेतकरी इच्छुक
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 एप्रिल 2018
पुणे ः परदेशातील शेतीमधील नवीन अद्ययावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांना माहिती व्हावे, या उद्देशाने कृषी विभागामार्फत परदेश अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले जाते. दोन ते तीन महिन्यांपूर्वी इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. कृषी विभागाकडे ३१ मार्चअखेरपर्यंत इच्छुक पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तब्बल ४८६ अर्ज दाखल झाले आहेत; मात्र अद्याप शासनाने निधी उपलब्ध करून न दिल्याने अभ्यास दौऱ्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरणार असल्याचे चित्र आहे. 
 
पुणे ः परदेशातील शेतीमधील नवीन अद्ययावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांना माहिती व्हावे, या उद्देशाने कृषी विभागामार्फत परदेश अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले जाते. दोन ते तीन महिन्यांपूर्वी इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. कृषी विभागाकडे ३१ मार्चअखेरपर्यंत इच्छुक पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तब्बल ४८६ अर्ज दाखल झाले आहेत; मात्र अद्याप शासनाने निधी उपलब्ध करून न दिल्याने अभ्यास दौऱ्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरणार असल्याचे चित्र आहे. 
 
विविध प्रगत देशांतील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून देणे, तसेच शेतीमालाची निर्यात, पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषीमाल प्रक्रिया याबरोबरच त्या देशामध्ये उपयोगात येत असलेले तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर करण्यासाठी सहाय्य करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी २००८ पासून शेतकऱ्यांना चीन, इस्राईल, जर्मनी, नेदरलॅंड्‌स, ऑस्ट्रीया, स्वित्झर्लंड, फ्रान्स, स्पेन, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर आदी ठिकाणी अभ्यास दौऱ्यासाठी पाठविले जाते.
 
या अभ्यास दौऱ्यातून मिळालेली माहिती लाभ पुणे जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी घेत शेतात काही प्रमाणात बदलदेखील केले आहे; मात्र मागील दोन ते तीन वर्षे हा दौरा बंद करण्यात आला होता. गेल्या आर्थिक वर्षात परदेश अभ्यास दौऱ्यासाठी पुणे जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. 
 
अभ्यास दौऱ्यासाठी एकूण ४९४ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी आठ अर्ज अपात्र ठरले असून, ४८६ अर्ज पात्र ठरविण्यात आले आहे. पात्र ठरविलेल्या अर्जांची यादी कृषी आयुक्तलयामार्फत सरकारकडे पाठविण्यात आली आहे.
 
शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी हवेली तालुक्‍यातून सर्वाधिक
शेतकरी इच्छुक आहेत. या तालुक्‍यातून सर्वाधिक ९२ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ शिरूर तालुक्‍यातून ६६ अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. 
 
तालुहानिहाय पात्र शेतकरी
तालुका शेतकरी संख्या 
भोर    २०
वेल्हा १२ 
मुळशी ३३ 
मावळ ३२
हवेली ९२
खेड  १६ 
आंबेगाव २९ 
जुन्नर ५२ 
शिरूर ६६ 
पुरंदर २२
बारामती ४० 
दौंड ३७ 
इंदापूर ३५

 

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...