agriculture news in marathi, farmers waiting for subsidy of micro irrigation scheme, nashik, maharashtra | Agrowon

नाशिक विभागातील शेतकऱ्यांना कृषी सिंचन योजनेच्या अनुदानाची प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 मार्च 2018
नाशिक : पावसाचे वाढते असमान वितरण आणि पाणीटंचाईचे चटके यातून पाणी बचतीचे महत्त्व उमगलेल्या नाशिक विभागातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाला प्राधान्य दिले. मात्र पूर्वमान्यता मिळालेल्या १४ हजार शेतकऱ्यांना या योजनेच्या अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे. 
 
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. लक्ष्यांकापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी कृषी विभागाकडे मागणी नोंदविली. आतापर्यंत विभागातील १७ हजार ५९६ शेतकऱ्यांना ४८ कोटी ८४ लाख ६१ हजार रुपये अनुदान वर्ग करण्यात आले.
 
नाशिक : पावसाचे वाढते असमान वितरण आणि पाणीटंचाईचे चटके यातून पाणी बचतीचे महत्त्व उमगलेल्या नाशिक विभागातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाला प्राधान्य दिले. मात्र पूर्वमान्यता मिळालेल्या १४ हजार शेतकऱ्यांना या योजनेच्या अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे. 
 
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. लक्ष्यांकापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी कृषी विभागाकडे मागणी नोंदविली. आतापर्यंत विभागातील १७ हजार ५९६ शेतकऱ्यांना ४८ कोटी ८४ लाख ६१ हजार रुपये अनुदान वर्ग करण्यात आले.
 
नाशिक विभागातील बहुतांश तालुक्‍यांत पर्जन्याचे असमान वितरण असल्याने पाणीटंचाईच्या क्षेत्राचा दरवर्षी विस्तार होत आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार, विभागातील निम्म्याहून अधिक तालुक्‍यांतील भूजलपातळी तीन मीटरपर्यंत खालावली आहे. पाणीटंचाईचा परिणाम विभागातील सिंचनावर झाला आहे.
 
पावसाच्या पाण्याचा साठा करणे आणि पाण्याची बचत करण्यासाठी आता विभागातील शेतकरी स्वतःहून पुढाकार घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ठिबक सिंचनामुळे काटकसरीने पाणी वापर करता येत असल्याने विभागातील शेतकऱ्यांचा ठिबक सिंचनास प्रतिसाद वाढू लागला आहे.
 
विभागातील तब्बल १७ हजार ५९६ शेतकऱ्यांनी शासनाच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून आपल्या शेतात ठिबक सिंचन सुविधा उभारली आहे. या योजनेतून शासनाने विभागातील शेतकऱ्यांना ४८ कोटी ८४ लाख ६१ हजार रुपये अनुदानही वितरित केले आहे. या निधीत ६३.४२ टक्के रक्कम केंद्र सरकारकडून प्राप्त झालेली आहे. 
 

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत अनुदानासाठी विभागातील ६० हजार १८६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यासाठी २२९ कोटी १३ लाख ५७ हजार रुपये निधीची गरज होती. मात्र प्रत्यक्षात ६९ कोटी ५२ लाख ३६ हजार रुपये इतकाच निधी विभागातील चार जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला.

ऑनलाइन नोंदणी केलेल्यापैकी अवघ्या ३१ हजार ६४२ शेतकऱ्यांच्या प्रस्तावांनाच कृषी विभागाने पूर्वमान्यता दिली. त्यापैकी केवळ १७ हजार ५९६ शेतकऱ्यांनाच अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. अजूनही १४ हजार ४६ शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यांना वितरीत झालेल्यापैकी अद्यापही २० कोटी ६७ लाख ७५ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांकडे पडून आहे. 

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...