agriculture news in marathi, farmers waiting for water of Girna, Hatanur | Agrowon

गिरणा, हतनूरच्या आवर्तनाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

जळगाव : जिल्ह्यातील अनेक गावांतील शेती, पिण्याच्या पाण्यासाठी आधार असलेल्या गिरणा, हतनूर धरणातून मार्चच्या पहिल्याच आठवड्यात नदीत पाणी सोडले जावे, अशी मागणी गावांमधील सरपंच, ग्रामस्थांची आहे. 

जळगाव : जिल्ह्यातील अनेक गावांतील शेती, पिण्याच्या पाण्यासाठी आधार असलेल्या गिरणा, हतनूर धरणातून मार्चच्या पहिल्याच आठवड्यात नदीत पाणी सोडले जावे, अशी मागणी गावांमधील सरपंच, ग्रामस्थांची आहे. 

गिरणा धरणाचे पाणी मागील १५ जानेवारी रोजी नदीत सोडण्यात आले होते. तापी नदीतून पाणीच सोडलेले नाही. गिरणातून रब्बीसाठी एकदाच आवर्तन सुटले. जानेवारीत गिरणा नदीत सोडलेले पाणी आटले आहे. नदी कोरडी पडू लागली आहे. केवळ मोठ्या खड्ड्यात  पाणी साचून राहिले आहे. तापी नदीतही मोठे डोह आटले आहेत. त्यात जळगाव तालुक्‍यातील भोकर, सावखेडा खुर्दनजीकचे सर्व डोह आटल्याने उन्हाळ्यात समस्या निर्माण होऊ शकते, अशी माहिती मिळाली.

गिरणा नदीच्या पाण्यावर लिंबू, केळीच्या बागांसह रब्बी हंगामाला लाभ मिळेल. कारण नदीकाठच्या विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण होईल. जिल्ह्यातील चाळीसगावसह पाचोरा, भडगाव, जळगाव, धरणगाव, भुसावळ, यावल, चोपडामधील अनेक गावांचा पाणी प्रश्‍न सुटण्यास मदत होईल. गिरणा धरणातून नदीत पिण्याच्या पाण्यासाठी प्रथम ५ नोव्हेंबर, २०१८ ला पहिले आवर्तन सोडण्यात आले. तापी नदीतून शेतीसाठी पाण्याची मागणी यावल, रावेरातील शेतकरी, लोकप्रतिनिधींनी केली. परंतु त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले.

वाघूर धरणातूनही भुसावळ भागात पाणी सोडण्याची, पाटचारी वाढविण्याची मागणी केली जात आहे. परंतु प्रशासन उद्योग व शहरांच्या पाण्याला अधिक महत्त्व देत आहे. गिरणा धरणावर मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा व भडगावच्या पिण्याच्या पाण्याचे आरक्षण आहे. वाघूरमध्ये जामनेर व जळगाव शहराला पाणीपुरवठा करावा लागतो. हतनूरवर जळगावमधील औद्योगिक वसाहत, भुसावळ शहर व काही स्थानिक उद्योगांना पाणी द्यावे लागत आहे. हे पाणी कमी पडू नये, यासाठी नदीत आवर्तन सोडण्यास प्रशासन विलंब करीत आहे, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.

इतर बातम्या
हॉर्सशू खेकडे हे कोळ्यांच्या अत्यंत...घोड्याच्या पायासारख्या दिसणाऱ्या खेकड्यांना...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
देहूगाव-लोहगाव गटाच्या पोटनिवडणुकीत...पुणे : सदस्याचे जातपडताळणी प्रमाणपत्र फेटाळल्याने...
पुणे-मुळशी बाजार समितीच्या विलीनीकरणास...पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची पाचव्यांदा...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
जलसंवर्धन आणि नियोजनासाठी संशोधनात्मक...औरंगाबाद : ज्याप्रमाणे अन्नधान्य टंचाईच्या काळात...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
खानदेशात तूर खरेदीबाबत ऑफलाइन नोंदणी...जळगाव ः खानदेशात तूर खरेदीसंबंधी शासकीय...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...