agriculture news in marathi, farmers waiting for water of irrigation scheme, sangli, maharashtra | Agrowon

कवठे महांकाळ तालुक्याला ‘टेंभू’च्या पाण्याची प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 जानेवारी 2018
आमच्या भागात पाणीटंचाई भासू लागली आहे. पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी आहे. ‘टेंभू’चे पाणी येण्यास २० दिवस लागतील. ‘टेंभू’चे पाणी आल्यावर रायेवाडीच्या तलावात सोडावे.
- धनाजी पाटील, रायेवाडी, ता. कवठे महंकाळ, जि. सांगली.
सांगली  : दुष्काळी भागाला वरदान ठरणारी टेंभू उपसा सिंचन योजना सुरू झाली आहे. याचा लाभ खानापूर, आटपाडी, कवठेमहंकाळ, तासगाव तालुक्यांना होतोय. मात्र कवठेमहंकाळ तालुक्यात या योजनेचे पाणी येण्यास अजून २० ते २५ दिवसांहून अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
 
टेंभू उपसा सिंचन योजना सुरू होण्यास आधीच उशीर झाला आहे. त्यामुळे कवठे महांकाळ तालुक्यातील सुमारे १२०० हेक्टर क्षेत्र पाण्यापासून वंचित आहे. पावसाळ्यात जरी पाऊस चांगला झाला असला तरी भूजल पातळी खालावली आहे.
 
योजना सुरू करण्यासाठी मागणी केली होती. त्यामुळे योजना सुरू झाली आहे. मात्र या तालुक्यातील नागज, आरेवाडी, नागोळाचा पूर्व भाग या भागातील सुमारे १२०० हेक्टर क्षेत्रातील पिके धोक्यात आली आहेत. टेंभूचे पाणी आल्यानंतर तलाव भरून द्यावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
 
पावसावर रब्बी हंगामातील शाळू पिकाची पेरणी केली. त्यानंतर कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे पिकाची अपेक्षित वाढ झालेली नाही. काही भागात पिके वाळून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतोय.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...