agriculture news in marathi, Farmers went to agriculture minister for orange crop insurance | Agrowon

संत्र्याच्या पीकविम्यासाठी कृषिमंत्र्यांकडे धाव
टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

अकोला : संत्रा पिकाची नुकसानभरपाई म्हणून मिळालेल्या विम्याची रक्कम राष्ट्रीयीकृत बॅंकेने कर्जखात्यात जमा केल्याने धास्तावलेले शेतकरी प्रशासनाच्या पायऱ्या झिजवून थकले आहेत. या शेतकऱ्यांनी आता थेट कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे धाव घेत दिलासा देण्याची मागणी केली आहे.

पीकविम्याची रक्कम कर्जखात्यात जमा करण्याचा अधिकारच बॅंकांना नसल्याचे या वेळी मंत्री म्हणाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. निदान यामुळे तरी आता दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

अकोला : संत्रा पिकाची नुकसानभरपाई म्हणून मिळालेल्या विम्याची रक्कम राष्ट्रीयीकृत बॅंकेने कर्जखात्यात जमा केल्याने धास्तावलेले शेतकरी प्रशासनाच्या पायऱ्या झिजवून थकले आहेत. या शेतकऱ्यांनी आता थेट कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे धाव घेत दिलासा देण्याची मागणी केली आहे.

पीकविम्याची रक्कम कर्जखात्यात जमा करण्याचा अधिकारच बॅंकांना नसल्याचे या वेळी मंत्री म्हणाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. निदान यामुळे तरी आता दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

गेल्या वर्षी अकोट तालुक्‍यात आंबीया बहारात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून विमा कंपन्यांकडून हेक्‍टरी १७ हजार ५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले; परंतु ही रक्कम काही राष्ट्रीयीकृत बॅंकांनी थेट कर्जखात्यात जमा केली. शेतकरी आपल्या खात्यातील पैसे काढण्यासाठी गेले असता हा प्रकार समोर आला होता.

त्यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी बॅंक अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्या खात्यात पैसे जमा केल्याचे बॅंकेकडून सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी तत्काळ बॅंकेच्या वरिष्ठांना, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, लीड बॅंक व्यवस्थापकांना निवेदने देत ही रक्कम बचतखात्यात वळती करण्याची मागणी केली.

प्रत्येक ठिकाणी आश्‍वासने मिळाले; मात्र अद्यापही पैसे वळते झाले नाहीत. नुकतीच या शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांची भेट घेत निवेदन दिले. त्यांनी आपण वरिष्ठांशी बोलून तातडीने यावर मार्ग काढण्याची सूचना देणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले आहे. आता तरी हे पैसे तातडीने मिळतील, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

येत्या काही दिवसांत या भागातील केळी उत्पादकांना पीकविम्याची रक्कम मंजूर होण्याची शक्‍यता आहे. हाही निधी बॅंकांनी कर्जखात्यात जमा केला तर अधिकच बिकट परिस्थिती होईल. त्यामुळे संत्रा पीकविम्याचा विषय तातडीने सुटावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...
साताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे  ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...
वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...
अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...
मालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...
दुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...