agriculture news in marathi, Farmers who got the certificate are far from debt waiver | Agrowon

प्रमाणपत्र मिळालेले शेतकरी कर्जमाफीपासून दूरच
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 डिसेंबर 2017

बुलडाणा : जिल्ह्यात ज्या २१ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र समारंभपूर्वक वाटप केल्या गेले, त्यापैकी अाठ जणांना अद्यापही कर्जमाफी तर मिळाली नाहीच. शिवाय बँकांना पाठवलेल्या ग्रीन यादीत या अाठ शेतकऱ्यांचा समावेश नसल्याचा अारोप चिखलीचे अामदार राहुल बोंद्रे यांनी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात केला. कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र दिलेल्यांना तरी कर्जमाफी मिळणार का, असा प्रश्नही त्यांनी शासनाला विचारला अाहे.

बुलडाणा : जिल्ह्यात ज्या २१ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र समारंभपूर्वक वाटप केल्या गेले, त्यापैकी अाठ जणांना अद्यापही कर्जमाफी तर मिळाली नाहीच. शिवाय बँकांना पाठवलेल्या ग्रीन यादीत या अाठ शेतकऱ्यांचा समावेश नसल्याचा अारोप चिखलीचे अामदार राहुल बोंद्रे यांनी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात केला. कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र दिलेल्यांना तरी कर्जमाफी मिळणार का, असा प्रश्नही त्यांनी शासनाला विचारला अाहे.

कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. याला अाता सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरीही शेतकऱ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नसल्याचे अा. बोंद्रे यांनी म्हटले.

शेतकऱ्यांचा वाढता रोष आणि विरोधकांकडून टीका होऊ नये म्हणून दिवाळीदरम्यान १८ ऑक्टोबर रोजी बुलडाणा जिल्ह्यातील २१ शेतकऱ्यांना कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते देण्यात आले.

वास्तविक बुलडाणा जिल्ह्यात ज्या ग्रीन यादीनुसार कर्जमाफी देल्याचे घोषित केले, त्या ग्रीन यादीमध्ये कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वाटप केलेल्या शेतकऱ्यांपैकी आठ जणांची नावेच नाहीत. या आठ शेतकऱ्यांमध्ये चिखली मतदारसंघातील चांडोळ येथील विठ्ठलराव देशमुख, धनपाल मुरादे, चांधई-आंधई येथील दिलीप तवर या तीन शेतकऱ्यांचा समावेश अाहे.

या शेतकऱ्यांच्या संबंधित बँक शाखेत प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा नसल्याचे अामदार बोंद्रे यांनी सभागृहाच्या निदर्शनास अाणून दिले. बुलडाणा जिल्ह्यात कर्जमाफी प्रमाणपत्र दिलेल्या शेतकऱ्यांसह इतरांची यादी पोर्टलवरून गायब करण्यात अाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यातसुद्धा पैसे जमा झाले नाहीत.

इतर बातम्या
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
नांदेड जिल्ह्यात दूध दरासाठी...नांदेड ः जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...