agriculture news in marathi, Farmers who landed on the Palkhi highway soon paid | Agrowon

पालखी महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना लवकरच मोबदला
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

वालचंदनगर, जि. पुणे ः संत तुकाराम महाराज पालखी महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून मोबदला देण्यास सुरवात होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली. 

वालचंदनगर, जि. पुणे ः संत तुकाराम महाराज पालखी महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून मोबदला देण्यास सुरवात होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली. 

लासुर्णे (ता. इंदापूर) गावामध्ये रस्त्याला वळण असल्याने रस्ता उत्तर बाजूकडे सरकला असल्याने या बाजूकडील शेतकऱ्यांनी पालखी महामार्गाला विरोध करून सध्याच्या 
राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूस समान पालखी महामार्ग करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात गावातील शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी गुरुवारी बारामतीमध्ये प्रांताधिकारी निकम यांची भेट घेऊन लासुर्णे गावामधील पालखी महामार्ग व मोबदल्याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. 

यावेळी निकम यांनी सांगितले की, लासुर्णे गावातून जाणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची मोजणी पूर्ण झाली आहे. गावामध्ये रस्त्यास वळण असल्याने रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूकडे महामार्ग सरकणार आहे. झालेल्या मोजणीमध्ये कोणताही बदल होणार नाही. तसेच काही बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी पहिल्या राजपत्रामध्ये कमी दाखविण्यात आल्या आहेत. त्यांच्या वाढीव जमिनी अधिग्रहणाबाबत पुरवणी राजपत्र लवकरच प्रसिद्ध होणार आहे. 

या वेळी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष गजानन वाकसे, अंकुश जामदार, प्रदीप शिंदे, बाळासाहेब सपकळ, विजय निंबाळकर, नीलेश पाटील, सचिन खरवडे, बंडू मुळे उपस्थित होते.

पुणे जिल्ह्याचा रेडिरेकनरचा दर जास्त असल्याने बाधित शेतकऱ्यांना व जागेच्या धारकांना मोबदला जास्त मिळणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या मोजणी, पंचनाम्याची कामे अंतिम टप्प्यात असून फेब्रुवारी महिन्यामध्ये रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. 
- हेमंत निकम, प्रांताधिकारी 
 

इतर बातम्या
मॉन्सूनने अलिबाग, मालेगावपर्यंतचा भाग...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचितसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला...
विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा :...परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म...
पूर्व विदर्भात दमदार पाऊसनागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊसकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर...बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर...