सुडाच्या राजकारणाला शेतकरीच उत्तर देतील ः बळिराम साठे

सुडाच्या राजकारणाला शेतकरीच उत्तर देतील ः बळिराम साठे
सुडाच्या राजकारणाला शेतकरीच उत्तर देतील ः बळिराम साठे

सोलापूर  : निवडणुकीच्या माध्यमातून बाजार समितीवर सत्ता मिळत नाही, म्हणूनच फेरलेखापरीक्षण केले. त्यानंतर तत्कालीन संचालकांवर कारवाई केली; परंतु जनता खूप हुशार झाली आहे. ती सुडाचे राजकारण करणाऱ्यांना मतदानातून उत्तर देईल, असे आव्हान जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळिराम साठे यांनी भाजपला दिले.

श्री सिद्धेश्‍वर विकास पॅनेलच्या प्रचारार्थ मंगळवारी कौठाळी येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश वानकर, नगरसेवक गणेश वानकर, बाबासाहेब पाटील, सुनील पाटील, मनोहर जगताप, सुनील भोसले, जितेंद्र साठे, प्रकाश चोरेकर, नामदेव गवळी, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण भोसले, पंचायत समितीचे सदस्य हरिदास शिंदे, जितेंद्र शिलवंत, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा उज्ज्वला पाटील आदी उपस्थित होते.

साठे म्हणाले, "सुडाच्या राजकारणातून काहीच साध्य होणार नाही. बाजार समितीचे ऑडिट पूर्वीच पूर्ण झाले, तरीदेखील पुन्हा एकदा त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांकडून ते करून तत्कालीन संचालकावर दोष नसतानाही कारवाई करण्यात आली. हे राजकारण आम्ही खपवून घेणार नाही आणि शेतकरीही ते सहन करणार नाहीत.''

शेतकऱ्याच्या पुत्रास सभापतिपदी बसविणार : सहकारमंत्री देशमुख

 "आम्ही राजकारणासाठी या निवडणुकीत उतरलो नाही. सत्तेच्या आडून शेतकऱ्यांची घरे मोडणाऱ्या दरोडेखोरांना लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकवावा लागेल. ही निवडणूक आम्ही शेतकऱ्यांच्या पोरांना बळ देण्यासाठी लढवत आहोत. विरोधात कितीही एकत्र अाले तरी बाजार समितीच्या सभापतिपदी शेतकऱ्याचा पुत्र बसवणार, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी श्री सिद्धरामेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलच्या प्रचारार्थ दक्षिण सोलापुरातील सावतखेड, घोडामद्रे, सिंदखेड, बंकलगी, बोरूळ, कणबस, शिरवळ, इंगळगी, आचेगाव, आलेगाव आदी गावांत देशमुख यांच्या जाहीर सभा झाल्या.  देशमुख म्हणाले, "बाजार समिती मिळवण्यासाठी जातीचे राजकरण विरोधक करत आहेत. मात्र, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जात आहोत. दबावाच्या राजकारणाला बळी न पडता बाजार समितीत सत्तांतर करून इतिहास घडवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com