agriculture news in marathi, Farmers will get daily advice on weather | Agrowon

शेतकऱ्यांना लवकरच मिळणार दररोज हवामान सल्ला
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जानेवारी 2018

नागपूर : राज्यात सुमारे दोन हजारांवर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी पूर्ण झाली आहे. या केंद्रांद्वारे शेतकऱ्यांना क्रॉपसॅपच्या धर्तीवर हवामान सल्ला देण्याचे प्रस्तावित आहे. प्रकल्पाची सुरवात जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

नागपूर : राज्यात सुमारे दोन हजारांवर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी पूर्ण झाली आहे. या केंद्रांद्वारे शेतकऱ्यांना क्रॉपसॅपच्या धर्तीवर हवामान सल्ला देण्याचे प्रस्तावित आहे. प्रकल्पाची सुरवात जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यात सुमारे २ हजार ५० हवामान केंद्रांची उभारणी झाली आहे. डोंगरगाव (जि. नागपूर) येथे अशाप्रकारचे पहिले केंद्र उभारले गेले. त्याचे उद्‍घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. प्रकल्पाअंतर्गत खासगी कंपनी कृषी विभागाला पुढची पाच वर्षे मोफत हवामान अपडेट पुरविणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून सद्यःस्थितीत दर दहा मिनिटाला हवामानाचे अपडेट मिळण्याची सोय आहे. सध्या पुणे कृषी आयुक्‍तालय स्तरावर हा डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानंतर आता प्रकल्प अंमलबजावणीच्या दुसऱ्या टप्प्यात कृषी विभागाने हा डेटा जिल्हा पातळीवर उपलब्ध होण्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयांना दिले आहेत. त्यामुळे जिल्हा पातळीवरदेखील हवामानाची माहिती मिळण्याची सोय झाली आहे.

जिल्हा कार्यालयामार्फत शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक घेत त्यांना हवामानाची माहिती कळविली जाईल. त्याआधारे शेतकरी पीक व्यवस्थापनाचा अंदाज घेतील आणि त्यांना पीक वाचविण्यासाठीच्या उपाययोजनांचे नियोजनदेखील करता येणार आहे. जानेवारीअखेरीस या उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‍घाटन होईल, अशी शक्‍यता आहे किंवा क्रॉपसॅपप्रमाणे हवामान सल्ला देण्याचे नियोजन करण्यात येईल का? याची चाचपणीदेखील कृषी विभाग करत आहे. त्यावरदेखील मंथन सुरू असून, दोनपैकी कोणता पर्याय सोयीचा राहील, याविषयी निश्‍चिती झाल्यानंतर त्यानुसार कार्यक्रम राबविला जाणार आहे.

डोंगरगावचे साहित्य गेले चोरीला
वर्षभरापूर्वी नागपूरजवळच्या डोंगरगाव येथे पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्‍घाटन केले. त्यानंतर त्या ठिकाणचे हवामान केंद्राचे साहित्य व यंत्रणाच चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे स्कायमेटला ती पुन्हा नव्याने बसवावी लागली.

महसूल मंडलनिहाय हवामान केंद्रे उभारणीचे काम झाले आहे. त्यासंबंधीचा नियंत्रण कक्ष पुण्यात असून, क्रॉपसॅपच्या धर्तीवर हवामान सल्ला शेतकऱ्यांना देता येईल किंवा मोबाईलवर अपडेट देता येईल याविषयी विचार सुरू आहे. या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्‍घाटन करतील, असे नियोजन आहे.
- सचिंद्र प्रतापसिंह, आयुक्‍त, कृषी

इतर अॅग्रो विशेष
गोकुळानं ‘गणित’ नाही मांडलंपशुपालनातून दूध व्यवसाय म्हणजे मुळातच उद्योग आहे...
ब्राझीलचा धडा घेणार कधी?सातत्याने दोन वर्षांच्या चांगल्या पाऊसमानानंतर...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...
दापोलीत उद्यापासून जॉइंट ॲग्रेस्कोपुणे ः यंदा ४६ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास...
बफर स्टॉकच्या शक्‍यतेने साखर १००...कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून मंदीच्या...
कापूस बियाणे सत्यता पडताळण्यासाठी ‘क्‍...जळगाव ः बोगस कापूस बियाण्याला आळा घालण्यासह...
फळपिकांसह एकत्रित क्रॉपसॅप योजना...मुंबई : राज्यातील प्रमुख फळ पिके व इतर पिकांवरील...
‘महावेध’ देणार शेतकऱ्यांना अचूक...मुंबई : लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत...
‘वनामकृवि’ कुलगुरू पदासाठी उद्या मुलाखतीपरभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सिंचनक्षमता बळकट करून फळबागशेती केली...केळीचे मुख्य पीक, त्याचे निर्यातक्षम उत्पादन,...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांच्या ‘डिमोशन’ला...अकोला ः सन २०११ मध्ये कृषी पर्यवेक्षक पदावर...
फळबाग शेती, रायपनिंग चेंबर, थेट विक्रीडोंगरकडा (जि. हिंगोली) येथील वयाच्या पासष्टीमध्ये...
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...