agriculture news in Marathi, farmers will get government new decision, Maharashtra | Agrowon

शासनाच्या नव्या निर्णयाचा महाबीज, राष्ट्रीय बीज निगमच्या बीजोत्पादकांना फायदा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

अकोला ः महाबीज आणि राष्ट्रीय बीज निगम यांच्या बीजोत्पादक शेतकऱ्यांना शासनाने बाजारभाव व किमान अाधारभूत किंमत यातील फरकाची रक्कम देण्याची योजना घोषित केल्याने राज्यातील सुमारे ३८ हजार बीजोत्पादकांना फायदा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अकोला ः महाबीज आणि राष्ट्रीय बीज निगम यांच्या बीजोत्पादक शेतकऱ्यांना शासनाने बाजारभाव व किमान अाधारभूत किंमत यातील फरकाची रक्कम देण्याची योजना घोषित केल्याने राज्यातील सुमारे ३८ हजार बीजोत्पादकांना फायदा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राज्यातच नव्हे तर देशभरातील बाजारपेठांमध्ये अनेक धान्यांचे दर हे हमीभावापेक्षा कमी राहत असल्याची वस्तुस्थिती गेल्या काही महिन्यात समोर अाली अाहे. महाबीज किंवा राष्ट्रीय बीज निगम हे नेहमी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील दरांचा विचार करून अापले दर ठरवित असतात. अशा परिस्थितीत बीजोत्पादक टिकवून ठेवण्यासाठी शासनाचा हा निर्णय महाबीज तसेच राष्ट्रीय बीज निगम साठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात अाहे.  

राज्यात सुमारे ३० ते ३२ हजार शेतकरी महाबीजसाठी तर पाच ते सहा हजार शेतकरी राष्ट्रीय बीज निगमसाठी बीजोत्पादन करीत असतात. या दोन्ही संस्थामिळून राज्यात सात ते अाठ लाख क्विंटल बीजोत्पादन होते. राज्यातील शेतकऱ्यांना रास्त दरात बियाणे मिळण्याचा हा एक सर्वात मोठा स्राेत असतो. 
गेल्या काही महिन्यांपासून बाजारपेठेतील दर व हमीभाव यात मोठी तफावत निर्माण झालेली अाहे.

शासनाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी न करण्याबाबत सूचना केलेल्या असल्या तरी प्रत्यक्षात वेगळी स्थिती असल्याचे सर्वश्रुत अाहे. अशा परिस्थितीत बीजोत्पादक शेतकऱ्यासाठी योग्य दर ठरविताना अडचणी येतात. अाता शासनाने बीजोत्पादक शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती आधारित दर व शासन घोषित किमान आधारभूत किंमत यामधील फरकाची रक्कम देण्यासाठी नवीन योजना अाखल्याने या प्रक्रियेत स्थिरता येऊ शकेल.

महाबीज किंवा राष्ट्रीय बीज निगम हे उत्पादीत बियाण्याचे दर शेतकऱ्याला देताना उच्चतम बाजारभावाचा विचार करीत असतात; परंतु कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याने उच्चतम दर हा कमी निघण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत बीजोत्पादक शेतकरी दुसऱ्या पर्यायी पिकांकडे वळण्याची शक्यताही नाकारता येणार नव्हती.

अाता बाजारात हमीभावापेक्षा कमी दर असला तरीही शासन ही तफावत भरून काढण्याची जबाबदारी घेत असल्याने महाबीज व राष्ट्रीय बीज निगमच्या हजारो बीजोत्पादक शेतकऱ्यांना थेट फायदा होण्यास मदत होणार अाहे.

बँक खात्यातच जमा होईल रक्कम
शासनाने केलेल्या निर्णयात तफावत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला; परंतु ही तफावतीची रक्कम शेतकऱ्याच्या अाधार लिंक असलेल्या बँक खात्यातच जमा केली जाणार अाहे. यासाठी शेतकऱ्यांना अाधार लिंक असलेले बँक खाते महाबीज, राष्ट्रीय बीज निगमकडे सादर करण्याची अावश्यकता अाहे.

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...