शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर कामगंध सापळे मिळणार

शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर कामगंध सापळे मिळणार
शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर कामगंध सापळे मिळणार

जळगाव : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने तयारी केली असून, बोंड अळीच्या पतंगांना अटकाव करण्यासाठी कामगंध सापळे उपलब्ध केले आहेत. एकरी पाच सापळे शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर वाटप करण्यात येणार आहेत.

गतवर्षीच्या हंगामात कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नावर परिणाम झाला. जिल्ह्यात कापसाची सर्वाधिक लागवड असून, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी कामगंध सापळ्यांचे तातडीने वितरण केले जावे, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी कृषी समितीच्या मासिक सभेत केली. जिल्हा परिषदेचे सभापती आणि उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सदस्यांसह कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी, कृषी उपसंचालक अनिल भोकरे आदी उपस्थित होते. या वेळी कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी लागेल, यावर चर्चा करण्यात आली.

असे करा बोंड अळीचे नियंत्रण   बोंड अळी रोखण्यासाठी निंबोळी अर्कची फवाणी केल्यास अळीचा प्रसार रोखणे शक्‍य आहे. लिंबाच्या पानापासून अर्क तयार करून फवारणी केल्यास त्याचा उपयोग होतो. यासोबतच शेतात पक्षी थांबे (ॲण्टीने) लावावेत. यावर पक्षी बसून ते अळी वेचून खातील आणि बोंड अळीचे नियंत्रण होईल. कामगंध सापळे, निंबोळी अर्क, पक्षी थांबे, सापळा पिके याचा उपयोग करून गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण करता येईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

भडगाव तालुक्‍यात आढळले पतंग गुलाबी बोंड अळीचे संकट कायम असल्याचा मुद्दा चर्चेत आला. त्या वेळी भोकरे म्हणाले, ‘‘आम्ही भडगाव तालुक्‍यात कापसाच्या शेतीला भेट दिली आहे. तेथे काही शेतांमध्ये गुलाबी बोंड अळीचे पतंग आढळून आले आहेत. पुढे गुलाबी बोंड अळी येऊ शकते. त्यामुळे उपाययोजना तातडीने व्हाव्यात. त्यानुसार जनजागृती केली जात आहे.``

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com