agriculture news in marathi, farming work has stop, becouse continuslly rain. | Agrowon

भिजपावसाने आंतरमशागतीची कामे रखडली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 जुलै 2018
जळगाव : जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून भिजपाऊस सुरू अाहे. सर्वाधिक पाऊस जळगाव जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात झाला आहे. त्याचा लाभ पिकांच्या वाढीसाठी होत आहे. वाफसा नसल्याने तण नियंत्रण, आंतरमशागतीची कामे रखडली आहेत. पावसाच्या उघडिपीनंतर वाफसा होण्यासाठी शेतकऱ्यांना दोन-तीन दिवस वाट पाहावी लागण्याची स्थिती आहे.
जळगाव : जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून भिजपाऊस सुरू अाहे. सर्वाधिक पाऊस जळगाव जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात झाला आहे. त्याचा लाभ पिकांच्या वाढीसाठी होत आहे. वाफसा नसल्याने तण नियंत्रण, आंतरमशागतीची कामे रखडली आहेत. पावसाच्या उघडिपीनंतर वाफसा होण्यासाठी शेतकऱ्यांना दोन-तीन दिवस वाट पाहावी लागण्याची स्थिती आहे.
जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात सोमवारी (ता.२३) सकाळी ८ पर्यंत चाळीसगाव तालुक्‍यात १८ मिलिमीटर, पाचोरा येथे १२, पारोळ्यात १८, अमळनेरात ११, चोपडा येथे १४, एरंडोलात ११, धरणगावात १८ मिलिमीटर पाऊस झाला. मध्य भागातील जळगाव तालुक्‍यात १६ मिलिमीटर, भुसावळात १२, जामनेरात १४ मिलिमीटर पाऊस झाला, तर पूर्व भागातील  मुक्ताईनगरात ११ मिलिमीटर, रावेरात १०, यावलमध्ये १०, बोदवडमध्ये १० मिलिमीटर पाऊस झाला.
 
जुलै महिन्यात सरासरीच्या ४० टक्के पाऊस झाला असून, ढगाळ वातावरण कायम आहे. फवारणीसाठीची अनुकूल स्थिती नाही. तरी काही शेतकरी स्टीकर वापरून तणनाशकांचा वापर करीत आहेत. कापूस, तूर, कडधान्य, तृणधान्य पिकांची वाढ बऱ्यापैकी आहे. त्यांची आंतरमशागत करण्याची वेळ आली आहे, परंतु वाफसा नसल्याने अडचण आहे. तापी, गिरणा काठालगतच्या काळ्या कसदार जमिनींमध्ये वाफसा होण्यास अधिक वेळ आहे. रविवारी (ता.२२) दिवसभर पावसाची रिपरीम सुरू होती. शेती कामे करताच आली नाहीत. शेतकऱ्यांनी रस्ते चिखलमय असल्याने बैलगाडी घेऊन शेतात जाणे टाळले. सोमवारी सकाळीही जिल्ह्यात हलका पाऊस सुरू होता.
धरणांमध्ये साठा वाढतोय
गिरणा नदीवरील गिरणा धरणाचा साठा जवळपास १९ टक्‍क्‍यांपर्यंत झाला आहे, तर वाघूरमधील साठाही ३८ टक्के झाला आहे. हतनूरचे १० दरवाजे उघडे आहेत. परंतु पश्‍चिम भागातील भोकरबारी, अग्नावती, मन्याड, बहुळा, अंजनी या मध्यम प्रकल्पांमधील साठा शून्य टक्केच आहे.

इतर ताज्या घडामोडी
हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर '...नवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना...
साताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
ऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...
ऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...
सस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...
केळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव  : पावसाळ्याचे सव्वादोन...
नगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...
बाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...
कोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...
आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...
संत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...
श्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...
कळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...
मोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...
कोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
आता खाण्यातही क्रिकेट !क्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...
चीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...