अकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्ण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला   ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेत अकोला जिल्ह्याची कामगिरी फारशी समाधानकारक नसल्याची बाब समोर अाली अाहे. साडेतीन हजार शेततळे खोदण्याचे उद्दिष्ट दिलेले असताना यंत्रणांना कशीबशी निम्मी म्हणजेच १७०० शेततळी पूर्ण करता अाली अाहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करीत उर्वरित शेततळ्यांची कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणांना दिले अाहेत.

अकोला जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे क्षेत्र मोठे अाहे. येथे शेतीत सिंचनासाठी शेततळे एक चांगला पर्याय निर्माण झाला. ज्यांनी शेततळे घेतले अशा शेतकऱ्यांना पावसाच्या खंड काळात एक ते दोन वेळा पाणी देता आल्याने पिके वाचली. काहींना पीक उत्पादनही चांगले अाले. यामुळे जिल्ह्यात शेततळ्यांना अधिक महत्त्व दिले जाते. शासनाने जिल्ह्यातील अकोला, अकोट, मूर्तिजापूर, बार्शी टाकळी, पातूर, तेल्हारा अाणि बाळापूर या सात तालुक्यांत ३५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट कृषी विभाग व यंत्रणांना दिले. सात तालुक्यांचा विचार करता प्रत्येक तालुक्याच्या वाट्याला केवळ ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट येते. असे असताना काही मोजकी मंडळे सोडली, तर यंत्रणांनी याबाबत फारसे गांभीर्य दाखवले नाही.

त्यामुळेच जिल्ह्यात केवळ १७०० शेततळी पूर्ण होऊ शकली. बुधवारी (ता. १४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या अाढावा बैठकीत शेततळ्यांचा मुद्दा समोर अाला, तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त केली. शेततळी निर्मितीबाबत अनुदानाचा अडथळा मोठ्या प्रमाणात समोर येत अाहे. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या रकमेत शेततळे तयार होत नाही. काही भागात शेततळे होत असले, तरी खडकाळ ठिकाणी पैसे कमी पडतात. यामुळे शेतकरीसुद्धा फारसा उत्साह दाखवीत नाहीत. अाजवर झालेल्या शेततळ्यांमधील बरीच शेततळी ही कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे पाठपुरावा करून पूर्ण करून घेतली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com