agriculture news in marathi, farmpond scheme status, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात १८२५ शेततळ्यांची कामे पूर्ण
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 एप्रिल 2018
जळगाव  ः मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात दोन हजार शेततळी निर्माण करण्याचा लक्ष्यांक देण्यात आला होता. यापैकी आतापर्यंत १८२५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. २८ शेततळ्यांची कामे सुरू आहेत.
 
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत ८ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १११ शेततळी शिंदी (ता. चाळीसगाव) येथे तर नगाव (ता. अमळनेर) येथे ५५ शेततळी पूर्ण झाली आहे. यामुळे ही योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. 
 
जळगाव  ः मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात दोन हजार शेततळी निर्माण करण्याचा लक्ष्यांक देण्यात आला होता. यापैकी आतापर्यंत १८२५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. २८ शेततळ्यांची कामे सुरू आहेत.
 
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत ८ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १११ शेततळी शिंदी (ता. चाळीसगाव) येथे तर नगाव (ता. अमळनेर) येथे ५५ शेततळी पूर्ण झाली आहे. यामुळे ही योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. 
 
२०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात १२५१ शेततळे पूर्ण करण्यात आली. अनुदान म्हणून ५ कोटी ७६ लाख निधी दिला होता. यापैकी ५ कोटी ७० लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आले आहेत. २०१६-१७ या वर्षात एकूण ५७४ शेततळी पूर्ण झाली आहेत. त्यासाठी प्राप्त झालेल्या २ कोटी ७६ लाखांचा निधी अनुदान म्हणून शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने जारी केली आहे.
 
या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळावा, याकरिता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून, वारंवार आढावा घेऊन जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांच्या शेतांजवळून वाहणाऱ्या नाल्यांवरही नाला बांध बांधले जावेत. त्यासाठी संबंधित भागातील शेतकऱ्यांची मते विचारात घेऊन कार्यवाही करावी. यामुळे शेतांलगतच पाणी जिरेल आणि विहिरी, कूपनलिका जिवंत होतील. अवर्षणप्रवण भागात याबाबत गतीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 
 

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...