लातूर विभागात निम्मीच शेततळी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

लातूर  : `मागेल त्याला शेततळे` योजनेंतर्गत लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांना मिळालेल्या उद्दिष्टाची जवळपास ५० टक्‍केच पूर्ती झाली आहे. शिवाय कामे पूर्ण झालेल्या शेततळ्यांपैकी ६२८ शेततळ्यांचे अनुदान अद्याप मिळणे बाकी असून, ते काम प्रगतीपथावर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मराठवाड्यातील लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड व उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांना २०१७-१८ मध्ये १८ हजार शेततळी निर्मितीचा लक्ष्यांक देण्यात आला होता. त्या लक्ष्यांकाची पूर्ती करताना या पाचही जिल्ह्यांत केवळ ९५९४ शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

निर्मिती करण्यात आलेल्या शेततळ्यांना शासनाच्या निकषाप्रमाणे अनुदान देण्यासाठी जवळपास ४२ कोटी ७ लाख ७३ हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता. प्राप्त निधीमधून जवळपास ८ हजार ९६६ शेतकऱ्यांना शेततळ्यांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. त्यापोटी प्राप्त निधीमधून ४० कोटी ३ लाख ११ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. ६२८ शेततळ्यांच्या निधीचे वितरण करण्यात आले नाही.

हे अनुदान वितरणाचे काम प्रगतीपथावर असल्याचे आकडे सांगतात. शेततळ्यांचे अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या लातूर जिल्ह्याचा अपवाद वगळता इतरत्र जास्त असल्याचे कृषी विभागाचे आकडे सांगतात.

शेततळ्यांची स्थिती

जिल्हा   लक्ष्यांक साध्य
लातूर ४८०० १६८८
उस्मानाबाद ३७०० २२६०
नांदेड  ४००० १६७६
परभणी ३००० १७६९
हिंगोली २५०० २२०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com