agriculture news in marathi, farmpond scheme status, pune | Agrowon

पुणे विभागात १५ हजार १९७ शेततळी पूर्ण
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 जून 2018

पुणे  ः पावसाचा खंड व पाणीटंचाई यामुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागामार्फत पुणे विभागात मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विभागात सुमारे १५ हजार १९७ शेततळी पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जवळपास ३० हजार हेक्‍टर क्षेत्राला संरक्षित पाणी मिळणार आहे.

दिवसेंदिवस कमी आणि अनिश्‍चित पावसाचा कोरडवाहू क्षेत्रातील पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. यावर ठोस स्वरूपाच्या दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी २०१६-१७ मध्ये शेततळे निर्माण करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते.

पुणे  ः पावसाचा खंड व पाणीटंचाई यामुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागामार्फत पुणे विभागात मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विभागात सुमारे १५ हजार १९७ शेततळी पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जवळपास ३० हजार हेक्‍टर क्षेत्राला संरक्षित पाणी मिळणार आहे.

दिवसेंदिवस कमी आणि अनिश्‍चित पावसाचा कोरडवाहू क्षेत्रातील पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. यावर ठोस स्वरूपाच्या दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी २०१६-१७ मध्ये शेततळे निर्माण करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते.

पुणे विभागासाठी सुमारे १९ हजार ७०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी सुमारे ६९ हजार १७६ अर्ज दाखल झाले होते. या सर्व अर्जधारकांनी सेवा शुल्क भरले. तांत्रिक अडचणीमुळे काही अर्ज रद्द करून २९ हजार ९६६ अर्ज धारकांना कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. त्यापैकी सध्या १५ हजार १९७ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

विभागात या योजनेअंतर्गत दारिद्य्र रेषेखालील शेतकरी; तसेच ज्या कुटुंबांमध्ये शेतकरी आत्महत्या झालेली आहे त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये ज्येष्ठता यादीत सूट देऊन प्राधान्याने त्यांची निवड करण्यात आली. इतर सर्व प्रवर्गातील शेततळी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची ज्येष्ठता यादीनुसार निवड करण्यात आली; तसेच मागील पाच वर्षांत किमान एक वर्ष तरी पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावांमधील लाभार्थ्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात आले होते. त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ विभागातील फळ उत्पादकांनी घेतला आहे.

कृषी विभागाने शेततळ्यांसाठी ७४ कोटी ९१ लाख ३७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यापैकी १४ हजार ९०२ शेततळ्यांसाठी ६९ कोटी १७ लाख ८४ हजार रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. पाच कोटी ७३ लाख रुपये शिल्लक निधी राहिला असून, त्याचे वाटप सुरू असल्याचे कृषी विभागातील विभागीय कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्हानिहाय झालेली शेततळे
जिल्हा पूर्ण झालेली शेततळी संरक्षित पाणी मिळणारे क्षेत्र (हेक्‍टर)
नगर ८३६० १६,७२९
पुणे २०१० ४०२०
सोलापूर  ४८२७ ९६५४
एकूण १५,१९७  ३०,३९४

 

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...