agriculture news in marathi, farmpond scheme status, sangli, maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात ४६०१ शेततळ्यांची कामे पूर्ण
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 जुलै 2018

सांगली  ः जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी कृषी विभागाने केली आहे. या योजनेर्तंगत जिल्ह्यात तब्बल ४६०१ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या शेततळ्यांत सध्या ५७०० टीसीएमहून अधिक पाणीसाठा निर्माण झाला असून, सुमारे ३ हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्र सिंचन खाली आले आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सांगली  ः जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी कृषी विभागाने केली आहे. या योजनेर्तंगत जिल्ह्यात तब्बल ४६०१ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या शेततळ्यांत सध्या ५७०० टीसीएमहून अधिक पाणीसाठा निर्माण झाला असून, सुमारे ३ हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्र सिंचन खाली आले आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करत कृषी विभागाने मागेल त्याला शेततळे या योजनेची प्रभावी अमंलबजावणी केली आहे. परिमाणी, जिल्ह्यात ४६०१ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये सर्वाधिक १५७३ शेततळी तासगाव तालुक्‍यात पूर्ण झाली आहे. तालुक्‍यात द्राक्षाचे मोठे क्षेत्र आहे. शेततळ्यांमुळे द्राक्ष पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन शेतकऱ्यांना करणे शक्‍य झाले आहे.

मिरज तालुक्‍यात ८९० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत तर कवठेमहांकाळ तालुक्‍यात ७९०, जत तालुक्‍यात ६४०, खानापूर तालुक्‍यात २७४ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी १९ कोटी २९ लाख रुपयांचे अनुदानही शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील ४ ६०१ शेततळ्यांत सुमारे ५७०० टीसीएमइतका पाणीसाठा झाला आहे. बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शेततळ्यांमुळे दिलासा मिळाला आहे.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...