agriculture news in marathi, farmpond scheme status, satara, maharashtra | Agrowon

साताऱ्यात ११७७ शेततळ्यांची कामे पूर्ण
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

सातारा  ः मागेल त्याला शेततळे योजनेतून सातारा जिल्ह्यात ११७७ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यापैकी १०६१ शेतकऱ्यांना अनुदानापोटी चार कोटी ८६ लाख रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

सातारा  ः मागेल त्याला शेततळे योजनेतून सातारा जिल्ह्यात ११७७ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यापैकी १०६१ शेतकऱ्यांना अनुदानापोटी चार कोटी ८६ लाख रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

राज्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली आहे. या योजनेतून सातारा जिल्ह्यासाठी दोन हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सुरवातीस जाहीर केलेल्या निकषांत बदल केल्याने ही योजना सर्वसमावेशक झाली होती. यामुळे शेतकऱ्यांचाही प्रतिसाद वाढला होता. या योजनेत आतापर्यंत ४८३६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये ३५५३ अर्ज पात्र तर १२१३ अर्ज अपात्र ठरले आहे. तसेच ७० अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे. पात्र अर्जापैकी २९६८ अर्जांना मंजुरी देण्यात आली. २४८१ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे.

पावसामुळे शेततळ्यांच्या कामांचा वेग काहीसा कमी झाला होता. सध्या ७९ शेततळ्यांचे काम सुरू असून, ११७७ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शाश्वत पाणीसाठ्यासाठी ही शेततळी फायदेशीर असली तरी राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या सहभाग कमी दिसून येत आहे. यासाठी कृषी विभागाने यायोजनेचा प्रसार आणि प्रचार करणे आवश्यक आहे.

तालुकानिहाय शेततळ्यांची पूर्ण झालेली कामे
सातारा  ७२, कोरेगाव १६९, खटाव १५९, माण ३००, फलटण २५६, वाई ६३, खंडाळा ७३, महाबळेश्वर ३, जावली १६, पाटण ८, कऱ्हाड ५८.

इतर ताज्या घडामोडी
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...