agriculture news in Marathi, Fast agitation for farmers in state, Maharashtra | Agrowon

अन्नदात्यासाठी राज्यभरात ‘अन्नत्याग’
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 मार्च 2018

पुणे ः राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येचा स्मृतीदिन आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे शक्ती उभी करण्याच्या उद्देशाने ‘एक उपवास अन्नदात्या’साठी हे अांदोलन सोमवारी (ता.१९) राज्यभरात झाले. साहेबराव करपे यांचे मूळ गाव असलेल्या चिलगव्हाण येथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

पुणे ः राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येचा स्मृतीदिन आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे शक्ती उभी करण्याच्या उद्देशाने ‘एक उपवास अन्नदात्या’साठी हे अांदोलन सोमवारी (ता.१९) राज्यभरात झाले. साहेबराव करपे यांचे मूळ गाव असलेल्या चिलगव्हाण येथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

चिलगव्हाण (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथे १९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे यांनी कुटुंबासह आत्महत्या केली होती. देशातील ही पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झाली. या घटनेला ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. विदर्भात जनमंच, किसानपुत्र, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी, शेतकरी जागर मंच यासह इतरही शेतकरी व सामाजिक संघटनांनी अन्नत्याग आंदोलनात भाग घेतला. चिलगव्हाण येथे आमदार राजेंद्र नजरधने यांच्या हस्ते (कै.) साहेबराव करपे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

पवनार (जि. वर्धा) येथे झालेल्या आंदोलनात अभिजित फाळके, ज्ञानेश वाकुडकर, अमर हबीब आदींचा सहभाग होता. 
  नगर येथे सरकारच्या धोरणाचा निषेध करत सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवसाचे अन्नत्याग अांदोलन केले. अकोला जिल्ह्यात शेतकरी जागर मंच, लोकजागर परिवार, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अांदोलनात भाग घेतला. 

बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यातील सोयंदेव येथे पाचशे पेक्षा अधिक स्त्री-पुरुष एकत्र येत अांदोलनात सहभागी झाले. नांदेड, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, बीड, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, कोल्हापूर, पुणे, सांगली, जळगाव, धुळे आदी जिल्ह्यातदेखील आंदोलन झाले.

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...