agriculture news in Marathi, fast agitation in state, Maharashtra | Agrowon

राज्यभरात अन्नत्याग आंदोलन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मार्च 2019

मुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करणे आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच शेतकरी विरोधी कायद्यांच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. १९) दिल्ली, मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. 

१९ मार्च १९८६ रोजी महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद आहे. चिलगव्हाण (जि. यवतमाळ) येथील बागायतदार शेतकरी कुटुंबातील साहेबराव करपे, मालती करपे या पती-पत्नींसह चार मुलांनी आत्महत्या केली होती. या घटनेला मंगळवारी १९ मार्च रोजी ३३ वर्षे पूर्ण झाली, परंतु राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा सिलसिला थांबलेला नाही. 

मुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करणे आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच शेतकरी विरोधी कायद्यांच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. १९) दिल्ली, मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. 

१९ मार्च १९८६ रोजी महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद आहे. चिलगव्हाण (जि. यवतमाळ) येथील बागायतदार शेतकरी कुटुंबातील साहेबराव करपे, मालती करपे या पती-पत्नींसह चार मुलांनी आत्महत्या केली होती. या घटनेला मंगळवारी १९ मार्च रोजी ३३ वर्षे पूर्ण झाली, परंतु राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा सिलसिला थांबलेला नाही. 

सरकारने आपली धोरणे राबवण्यासाठी कायदे केले. सरकारे बदलली पण शेतकरी विरोधी कायदे बदलले गेले नाहीत. शेतकरी गुलाम आहेत म्हणून त्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. खरे तर या आत्महत्या नसून, सरकारने व व्यवस्थेने पाडलेले खून आहेत. शेतकरी विरोधी कायद्यांपासून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य द्यायला कोणी तयार नाही. याच्या निषेधार्थ १९ मार्च रोजी आत्महत्या केलेल्या सर्व शेतकऱ्यांना स्मरून शेतकरी स्वातंत्र्यासाठी एक दिवस अन्नदात्यासाठी अन्नत्याग करण्यात आल्याचे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले. 

मुंबई व उपनगर परिसरातील शेतकरीपुत्र शेतकरी कृती समितीचे विवेक रणदिवे, आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे, शेतकरी संघटनेचे कडुअप्पा पाटील, किसानपुत्र प्रदीप म्हैसाने, शेतकरी संघटनेचे गणेश घुगे, गिरीश राऊत, संजय पारकर, सुधाकर गोसावी, कुंदन राऊत आदी या वेळी उपस्थित होते. मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणीसह ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश तसेच राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी अन्नत्याग करत शेतकरी विरोधी कायद्यांचा निषेध केला.

इतर अॅग्रो विशेष
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...