agriculture news in Marathi, favorable condition for rain, Maharashtra | Agrowon

पावसाला पोषक हवामान; मंगळवेढा, पंढरपूरच्या काही भागात पाऊस
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

पुणे : उत्तरेकडील वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात थंडीचा कडाका कमी होऊ लागला आहे. विदर्भात मात्र थंडीची लाट कायम आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने आज (ता.११) पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर गुरुवारपासून (ता. १४) विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

पुणे : उत्तरेकडील वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात थंडीचा कडाका कमी होऊ लागला आहे. विदर्भात मात्र थंडीची लाट कायम आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने आज (ता.११) पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर गुरुवारपासून (ता. १४) विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

दरम्यान, सोमवारी (ता.११) रात्री उशिरा मंगळवेढा, पंढरपूरच्या काही भागात पाऊस पडल्याचे वृत्त होते. याशिवाय मंगळवेढ्यातील शिरनांदगी, मारोळी भागात वाऱ्याने नुकसान झाले. अक्कलकोट, दक्षिण- उत्तर सोलापुरात ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वाराही सुरु होता.

उत्तरेकडील पश्चिमी चक्रावाताची स्थिती पूर्वेकडे सरकत आहे. त्यामुळे काेकण, मध्य महाराष्ट्रात वाढलेला कडाका कमी होऊन विदर्भात थंडी वाढली आहे. राज्याच्या उत्तर भागात मात्र अद्यापही गारठा टिकून आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ५.६ अंश सेल्सिअस, विदर्भातील नागपूर येथे ७.६ अंश सेल्सिअस, तर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ८.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. विदर्भात अनेक तापमान १० अंशांच्या असपास असून, ब्रह्मपुरी आणि नागपूर येथे थंडीची लाट कायम आहे.  

वाऱ्यांच्या प्रवाह होणारे बदल, अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरावरून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे आज (ता. १२) कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमध्ये, तर उद्या (ता. १३) धुळे, नाशिक, नगर, पुण्यातही ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी विदर्भात वादळी  वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. 

सोमवारी (ता. ११) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १०.६ (-१.२), नगर ८.५ (-४.१), जळगाव ११.६ (-२.०), कोल्हापूर १७.१ (०.९), महाबळेश्‍वर १४.० (-०.२), मालेगाव १०.४ (-१.२), नाशिक १०.२, सांगली १३.८ (-१.९), सातारा १३.० (-१.२), सोलापूर १९.९ (१.९), सांताक्रूझ १५.४ (-२.४), अलिबाग १६.५ (-१.४), रत्नागिरी १६.७ (-२.६), डहाणू १४.१ (-३.७), आैरंगाबाद १२.४ (-१.२), परभणी १३.२ (-३.०), नांदेड १३.५ (-१.८), अकोला १०.८ (-५.१), अमरावती ११.४ (-५.३), बुलडाणा १३.६ (-२.६), ब्रह्मपुरी ९.३ (-६.२), चंद्रपूर १४.० (-२.७), गोंदिया १०.० (-५.३), नागपूर ७.६ (-७.९), वर्धा ११.५ (-३.५), यवतमाळ १३.० (-४.२).

इतर बातम्या
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर  : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...
तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...