agriculture news in marathi, favorable weather condition benefit raisin production | Agrowon

अनुकूल हवामानामुळे यंदा दर्जेदार बेदाणानिर्मिती
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 एप्रिल 2019

दरवर्षी अवकाळी पावसाने बेदाण्याचे मोठे नुकसान होते. परंतु यंदा निसर्गाने चांगली साथ दिल्याने चांगल्या दर्जाचा बेदाणा तयार झाला आहे. 
- सुनील माळी, बेदाणा उत्पादक शेतकरी, 
कवठे महाकांळ, जि. सांगली

सांगली : यंदा बेदाणा निर्मितीसाठी अनुकूल हवामान होते. यामुळे दर्जेदार बेदाणा तयार झाला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बेदाणे हंगाम चालला. सुमारे चार महिने चाललेला हा हंगाम आता उरकला आहे. 

कवठेमहांकाळ तालुक्‍यातील हवामान बेदाणा निर्मितीस पोषक आहे. यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यात दर्जेदार बेदाणा तयार होतो. या परिसरात सुमारे ६ हजार बेदाणा शेड आहेत. यापैकी या हंगामात ९० टक्के शेडवर बेदाणा निर्मिती झाली.
येथे कोरडे व भरपूर सूर्यप्रकाश असे हवामान असल्याने चार किलो द्राक्षांपासून सुमारे एक ते दीड किलो बेदाणा तयार होतो. यंदा द्राक्ष हंगामाच्या सुरवातीपासूनच पाण्याची टंचाई होती. टॅंकरने पाणी देऊन द्राक्ष बागा जगविल्या. यंदाच्या हंगामात ३५ हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावरील द्राक्षांपासून बेदाणा तयार झाला आहे. 

जानेवारी ते मार्च महिन्यात अवकाळी पावसाची भीती असते. दोन वर्षांपूर्वी ऐन बेदाणा हंगामात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे बेदाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गेल्या वर्षी बेदाणा हंगाम अवकाळी पावसातून निसटला. यंदाही अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात भीती निर्माण झाली होती. परंतू यंदा बेदाणा पट्ट्यात अवकाळी पाऊस झाला नाही. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. बेदाणा तयार करण्यासाठी यंदा पोषक हवामान होते. पाऊस आणि गारपीट झाली नसल्याने दर्जेदार बेदाणा तयार झाला आहे. परिणामी बेदाण्यास चांगला दर मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...