agriculture news in marathi, Fear of crops in Mahabaleshwar taluka | Agrowon

महाबळेश्र्वर तालुक्यात पिके कुजण्याची भीती
टीम अॅग्रोवन
रविवार, 2 सप्टेंबर 2018

सातारा ः जिल्ह्यात सर्वाधिक महाबळेश्र्वर तालुक्यास पावसाने झोडपले आहे. या अतिपावसामुळे भात, बटाटा, नाचणी ही पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर, स्ट्राॅबेरीच्या रनरची वाढ खुंटली असून, वाटाणा लागवड रखडली असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाबळेश्र्वर हा अतिपर्जन्य छायेचा तालुका म्हणून या राज्यात ओळख आहे. या तालुक्यात आॅगस्टअखेर सरासरी १८४६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या तालुक्यात संततधार पाऊस, सतत धुके, ढगाळ वातावरणामुळे दोन महिन्यांपासून सूर्यदर्शनही झालेले नाही.

सातारा ः जिल्ह्यात सर्वाधिक महाबळेश्र्वर तालुक्यास पावसाने झोडपले आहे. या अतिपावसामुळे भात, बटाटा, नाचणी ही पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर, स्ट्राॅबेरीच्या रनरची वाढ खुंटली असून, वाटाणा लागवड रखडली असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाबळेश्र्वर हा अतिपर्जन्य छायेचा तालुका म्हणून या राज्यात ओळख आहे. या तालुक्यात आॅगस्टअखेर सरासरी १८४६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या तालुक्यात संततधार पाऊस, सतत धुके, ढगाळ वातावरणामुळे दोन महिन्यांपासून सूर्यदर्शनही झालेले नाही.

या दमदार पावसाचा शेतीला फटका बसला आहे. या तालुक्यात स्ट्राॅबेरी हे नगदी पीक असून, सुमारे २५०० एकर घेतले जाते. स्ट्राॅबेरीचे जून ते आॅगस्ट महिन्यात मातृवृक्षापासून रोपेनिर्मितीची प्रक्रिया केली जाते. याच कालावधीत जास्त पाऊस झाल्याने मातृवृक्षापासून अत्यल्प फुटवे निघाले असून, फुटव्याचे रनर पिशव्यांमध्ये धरणे अवघड
झाल्याने नवीन रोपे तयार होण्यावर मर्यादा आल्या आहेत. यामुळे लागवडीचा काळ लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भात, नाचणी, बटाटा अतिपाण्यामुळे कुजू लागली आहेत. झाडाखाली असलेल्या पिकांना सर्वाधिक फटका बसत आहे. स्ट्राॅबेरीसह वाटाणा पिकांसाठी महाबळेश्वर तालुका प्रसिद्ध आहे. या तालुक्यात १५ आॅगस्टदरम्यान वाटाण्याच्या लागवडीस प्रारंभ होतो. या वेळी मात्र पाऊस सुरू असल्याने ही लागवड रखडली आहे. त्यातूनही काही शेतकऱ्यांनी केलेली लागवड पावसामुळे वाया गेली आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
वाटाण्याच्या लागवडीस उशीर झाल्याने पहिल्या टप्प्यात मिळणारा चांगल्या दरास येथील शेतकरी मुकणार आहेत. एकूणच अतिवृष्टीचा फटाका पिकांना बसल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.

इतर बातम्या
कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...
`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे  ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...
वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...
वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ४० टक्के...वर्धा : यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान...
धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊसधुळे : शहरासह धुळे तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात...
अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...
मराठवाड्यात उपयुक्‍त पाणी उरले केवळ २५...औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाची...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
मालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...
वनामकृवि आणि महाअॅग्रोमध्ये सामंजस्य...परभणी ः कृषी विस्तार कार्याअंतर्गत सार्वजनिक-...
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...