agriculture news in Marathi, February was cold on last four years, Maharashtra | Agrowon

चार वर्षांत यंदाचा फेब्रुवारी सर्वांत थंड
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 मार्च 2018

पुणे : प्रशांत महासागरातील ला-निना स्थिती निवळण्यास सुरवात झाली आहे. तरी समुद्र थंड असल्याने सध्या जागतिक तापमानही कमी आहे. यंदाचा फेब्रुवारी महिना २०१४ पासूनच्या चार वर्षांतील सर्वांत थंड ठरला आहे. तर डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांचा हंगामही चार वर्षांत थंड होता, असे मत अमेरिकेतील नोआ संस्थेच्या राष्ट्रीय पर्यावरणीय माहिती केंद्राच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. 

पुणे : प्रशांत महासागरातील ला-निना स्थिती निवळण्यास सुरवात झाली आहे. तरी समुद्र थंड असल्याने सध्या जागतिक तापमानही कमी आहे. यंदाचा फेब्रुवारी महिना २०१४ पासूनच्या चार वर्षांतील सर्वांत थंड ठरला आहे. तर डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांचा हंगामही चार वर्षांत थंड होता, असे मत अमेरिकेतील नोआ संस्थेच्या राष्ट्रीय पर्यावरणीय माहिती केंद्राच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. 

चार वर्षांत यंदाचा फेब्रुवारी थंड ठरला असला तरी, ‘नोआ’ने केलेल्या विश्‍लेषणानानुसार यंदाच्या फेब्रुवारी महिन्यातील तापमान विसाव्या शतकातील सरासरी (५३.९ अंश फॅरन्हाईट) तापमानापेक्षा १.१७ अंश फॅरेन्हाईटने जास्त आहे. हे १८८० ते २०१८ या १३९ वर्षांतील ११ वे उच्चांकी तापमान ठरले आहे. विसाव्या शतकातील सरासरी तापमानापेक्षा अधिक तापमान नोंदले गेलेल्या ३९८ महिन्यांमध्ये ४२ फेब्रुवारी महिन्यांचा समावेश आहे. 

उत्तर गोलार्धामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी हिवाळा ऋतूचा, तर दक्षिण गोलार्धात उन्हाळा ऋतूचा शेवट होतो. डिसेेंबर ते फेब्रुवारी या हंगामातील जागतिक तापमान २० व्या शतकातील सरासरी (५३.८ अंश फॅरेन्हाईट) तापमानापेक्षा १.२२ अंश फॅरेन्हाईटने अधिक असल्याचे दिसून आले आहे. या हंगामात नोंदले गेलेले तापमान  आतापर्यंतचे ८ वे उच्चांकी तापमान ठरले असले, तरी २०१४ पासूनचे सर्वांत थंंड तापमान ठरले असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. 

यंदाच्या फेब्रुवारीत धृवीय प्रदेशातील बर्फाचे अाच्छादन कमी असल्याचे दिसून आले आहे. यात आर्टिक समुद्रात १९९८ ते २०१० या कालावधीतील बर्फ आच्छादनापेक्षा ८.८ टक्क्यांनी कमी बर्फ होते. १९७९ नंतरच्या फेब्रुवारी महिन्यातील हे सर्वांत कमी अाच्छादन आहे. तर अंटार्टिक समुद्रामध्ये बर्फाचे अाच्छादन २५.४ टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून आले असून, हे आतापर्यंतचे दुसरे सर्वांत कमी बर्फ ठरले आहे. २० आणि २१ फेब्रुवारी रोजी अंटार्टिका समुद्रात आतापर्यंतचे दुसऱ्या क्रमांकाचे तर यंदाच्या वर्षांतील सर्वांत कमी ८ लाख ४२ हजार मैल प्रदेशावर बर्फ होते. 

यंदाच्या फेब्रुवारीतील जमीन आणि समुद्राच्या जागतिक सरासरी तापमानाचा विचार करता आतापर्यंतचे १५ वा उष्ण तापमान ठरले असून, डिसेंबर ते फेब्रुवारी सातवा उष्ण हंगाम ठरला आहे. महिन्यातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आतपर्यंत सातवे उष्ण असून, सहावा उष्ण हंगाम असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

इतर अॅग्रो विशेष
भारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...
राज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...
चारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...
देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...
खरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...
दुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...