agriculture news in marathi, In February, water intensity increased | Agrowon

फेब्रुवारीतच पाणीटंचाईची तीव्रता वाढली
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

अकोला  ः या वर्षात कमी झालेल्या पावसामुळे प्रकल्प भरले नाहीत. नदी-नालेही न वािहल्याने जमिनीत पाणी जिरले नाही. याचा परिणाम या वर्षी जानेवारीपासून दिसून येत अाहे. असंख्य विहिरींनी तळ गाठल्याने सिंचनाची कामे टप्प्याटप्प्याने करावी लागत अाहेत. यामुळे येत्या काळात उन्हाळी पिकांची लागवड घटण्याची शक्यता निर्माण झाली असून, फेब्रुवारीतच पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे.  

अकोला  ः या वर्षात कमी झालेल्या पावसामुळे प्रकल्प भरले नाहीत. नदी-नालेही न वािहल्याने जमिनीत पाणी जिरले नाही. याचा परिणाम या वर्षी जानेवारीपासून दिसून येत अाहे. असंख्य विहिरींनी तळ गाठल्याने सिंचनाची कामे टप्प्याटप्प्याने करावी लागत अाहेत. यामुळे येत्या काळात उन्हाळी पिकांची लागवड घटण्याची शक्यता निर्माण झाली असून, फेब्रुवारीतच पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे.  
वऱ्हाडात अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत सातत्याने पावसाचे प्रमाण कमी होत चालले अाहे. या वर्षी सरासरी ८० टक्क्यांच्या अात पाऊस झाला. पडलेला पाऊससुद्धा खंड स्वरुपात होता. सलग पावसाअभावी नदी-नाल्यांना पूर वाहले नाहीत. त्यामुळे प्रकल्पही भरू शकलेले नाहीत. जमिनीतील पातळी दीड ते अडीच मीटरपर्यंत घटल्याचे सांगितले जाते.

पाणीपातळी घटल्याने विहिरींनी तळ गाठला. काही भागात विहिरींचे सिंचन कमी झाले. रब्बी हंगाम निघाला मात्र जे शेतकरी उन्हाळी पिके घेत असायचे त्यांच्या समोर पेच अाहे. पाण्याची घटलेली पातळी आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे पिकांचा ताळमेळ चुकत अाहे. पूर्वी मुबलक पाणी असलेल्या शेतकऱ्यांकडे सध्या पाण्याची समस्या वाढली. पाणीपुरवठा योजनासुद्धा प्रभावित झाल्या अाहेत.

संग्रामपूर तालुक्यात खारपाणपट्ट्यात पाण्याची पातळी खालावत आहे. यंदा तर कांदा पीक घेता येईल इतकेही पाणी राहिलेले नाही. जमिनीत पाण्याची पातळी खोल गेल्याने रब्बीसह खरिपात कपाशी लागवड क्षेत्र अल्प राहील अशी स्थिती अाहे.
- संतोष राजनकर, शेतकरी संग्रामपूर जि. बुलडाणा

पाण्याची पातळी खोल गेल्याने अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार अाहे. मी दरवर्षी करार पद्धतीने अाजूबाजूच्या शेतकऱ्यांचे शेत करीत होतो. पण सध्याची पाण्याची परिस्थिती पाहता या वर्षी ते करणे शक्य दिसत नाही. माझी सध्या तीन एकर केळी व दोन एकर पानपिंपरी आहे. पाणी समस्येमुळे ही पिके जगविणे जििकरीचे झाले अाहे.
- पंकज धर्मे, शेतकरी, बोर्डी जि. अकोला

नववर्षांचे स्वागतच पाणीटंचाईने झाले आहे. सध्या लहान मोठ्यांना पाण्यासाठी शिवारांमध्ये भटकावे लागत आहे. पुढील पाच महिने पाणीटंचाई भीषण होणार आहे. शासनाने तत्काळ गावामध्ये पाणी निवारणार्थ उपाययोजना करण्याची गरज अाहे.
- परशराम चोपडे, ग्रामस्थ, भरजहाँगीर, जि. वाशीम

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...