agriculture news in marathi, female voters ration increased, Maharashtra | Agrowon

राज्यात महिला मतदारांची संख्या वाढली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

मुंबई: राज्यातील महिला मतदारांच्या नोंदणीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. १३ लाख नवीन महिला मतदारांची नव्याने भर पडली आहे. मतदार संख्येचा अंतिम आढाव्यात राज्यात एकूण ८ कोटी ७३ लाख मतदार असल्याचे स्पष्ट झाले. यापैकी ४ कोटी ५७ लाख पुरुष, तर ४ कोटी १६ लाख महिला मतदार आहेत. त्यामुळे दर हजारी पुरुषांच्या तुलनेत यंदा महिलांचे प्रमाण ९११ इतके आहे जे २०१४ साली ९०५ इतके होते. राज्यातील महिला मतदारांचे वाढते प्रमाण आशादायक असल्याची नोंद निवडणूक आयोगाने केली आहे. 

मुंबई: राज्यातील महिला मतदारांच्या नोंदणीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. १३ लाख नवीन महिला मतदारांची नव्याने भर पडली आहे. मतदार संख्येचा अंतिम आढाव्यात राज्यात एकूण ८ कोटी ७३ लाख मतदार असल्याचे स्पष्ट झाले. यापैकी ४ कोटी ५७ लाख पुरुष, तर ४ कोटी १६ लाख महिला मतदार आहेत. त्यामुळे दर हजारी पुरुषांच्या तुलनेत यंदा महिलांचे प्रमाण ९११ इतके आहे जे २०१४ साली ९०५ इतके होते. राज्यातील महिला मतदारांचे वाढते प्रमाण आशादायक असल्याची नोंद निवडणूक आयोगाने केली आहे. 

२०१४ पूर्वी महिला मतदारांचे हेच गुणोत्तर दरहजारी पुरुषांमागे ८७५ ते ८८० इतके होते. त्यानंतर सरकारने महिला मतदारांचा सहभाग वाढावा, यासाठी मतदार नोंदणीचे विशेष अभियान राबवले त्यामुळे महिला मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याचे उच्चपदस्थांनी सांगितले. राज्यातील मागास आणि प्रगत राज्यांमध्येही महिला मतदारांच्या नोंदणीमध्ये वाढ व्हावी, यासाठी देशपातळीवरही प्रयत्न केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

१९६० महिला मतदारांचे हेच प्रमाण ७१५ होते तर दर हजारी पुरुषांमागे हेच प्रमाण २००० साली ८८३ इतके होते. तर २०११ साली ९४० इतके झालेले प्रमाण हे १९७१ नंतरचे सर्वाधिक होते. 
महिला मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील हा वाढता सहभाग महत्त्वाचा असून राजकीय पक्षांनीही याची दखल घेऊन महिलांना त्यांच्या मतदारसंख्येच्या प्रमाणात योग्य प्रतिनिधित्व द्यायला हवे, असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. २०१८ मध्ये मतदार नोंदणीचा आढावा घेण्यात आल्यानंतर एकूण नव्या २८ लाख मतदारांची भर पडल्याचे दिसते आहे. तर सुमारे ७ लाख ३० हजार मतदारांची नावे कमी करण्यात आली आहेत.

देशातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मतदारांची संख्या पाहिली तर ती ६८ टक्के आहे. मात्र, राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी ७८ टक्के नागरिक हे मतदार आहेत. लाकसंख्येच्या वाढत्या वयामुळे आणि स्थलांतरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने देशाच्या तुलनेत राज्यातील मतदारांची संख्या वाढल्याचे दिसत असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मतदारांची नोंदणी आणि नावे कमी करण्याची प्रक्रिया ही निवडणूक जाहीर होईपर्यंत सुरू राहते. तोपर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांची नावे ही मतदार यादीत दिसतात.

नव्याने नोंदणी झालेल्या २८ लाख मतदारांपैकी १२ लाख मतदार १८ ते १९ या वयोगटातील असून हे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. नवमतदारांसाठी आम्ही विशेष मोहीम महाविद्यालये आणि सार्वजिनक ठिकाणी राबवली होती त्याला प्रतिसाद मिळाला असून २० ते २९ वयोगटांतील मतदारांची संख्या सुमारे १ कोटी ६० लाख इतकी असल्याचेही त्यानी सांगितले.
 

इतर बातम्या
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
नांदेड, परभणी, हिंगोली, लातूरमध्ये आज...नांदेड : लोकसभेच्या नांदेड, परभणी, हिंगोली...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
‘महाबीज’तर्फे बीजोत्पादनासाठी आगाऊ...जळगाव : आगामी खरिपासाठी सोयाबीन, उडीद, मूग, ताग,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यावर संकटनाशिक : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
पेमेंट न मिळाल्याने वसाकाच्या ऊस...नाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...