सोलापुरात मेथी, कोथिंबीर, शेपूच्या दरात सुधारणा

मेथी
मेथी

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात मेथी, कोथिंबीर, शेपूच्या दरात सुधारणा झाली. भाज्यांची आवकही जेमतेमच राहिली. त्यामुळे मागणीही टिकून आहे. भाज्यांना शंभर जुड्यांसाठी सर्वाधिक ५०० रुपयांपर्यंतचा दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात भाज्यांमध्ये मेथीची सर्वाधिक १० ते १५ हजार जुड्यांपर्यंत रोजची आवक राहिली. त्यानंतर कोथिंबिरीची ५ हजार जुड्यांपर्यंत राहिली, तर शेपूची अगदीच ४ हजार जुड्यांपर्यंत आवक झाली. भाज्यांची आवक सर्वाधिक स्थानिक भागातूनच झाली. भाज्यांना मागणी राहिल्याने दरातील तेजीही टिकून राहिली. मेथीला शंभर जुड्यांसाठी ४०० ते ५०० रुपये, कोथिंबिरीला ३०० ते ४०० रुपये आणि शेपूच्या २०० ते ३५० रुपये इतका दर मिळाला. त्याशिवाय वांगी, हिरवी मिरची, ढोबळी मिरचीचे दरही काहीसे स्थिर राहिले. त्यांची आवकही जेमतेमच राहिली. या फळभाज्यांची आवकही स्थानिक भागातून झाली. वांग्याला प्रति दहा किलोसाठी १२० ते १८० रुपये, हिरव्या मिरचीला १५० ते २०० रुपये आणि ढोबळी मिरचीला १०० ते १८० रुपये असा दर मिळाला. गवार, भेंडीच्या दरातील तेजी या सप्ताहातही कायम राहिली. गवारीला प्रति दहा किलोसाठी २०० ते ४०० रुपये आणि भेंडीला २०० ते ३५० रुपये असा दर मिळाला. कांद्याचे दर टिकून कांद्याची आवक या सप्ताहात काहीशी कमीच राहिली. रोज किमान २०० ते ३०० गाड्यांपर्यंत आवक झाली. कांद्याची आवक स्थानिक भागातूनच  झाली. बाहेरील आवकही जेमतेमच राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० ते २५०० व सरासरी १५०० रुपये असा दर होता. या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत दरात किंचित चढ-उतार झाला, पण दर टिकून राहिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com