राज्यात मेथी प्रतिशेकडा १५० ते ६०० रुपये

राज्यात मेथी प्रतिशेकडा १५० ते ६०० रुपये

सोलापुरात शेकडा ३०० ते ५०० रुपये  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात मेथीची आवक तुलनेने कमी राहिली. पण मागणी कमी असल्याने दरही टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात मेथीची रोज १० हजार पेंड्या आवक होती. त्याची सर्वाधिक आवक जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, मोहोळ भागांतून झाली. त्याआधीच्या आठवड्यात हीच आवक रोज १२ हजार पेंड्यांपर्यंत होती. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून दरात काहीशी सुधारणा झाली, पण पुन्हा आवक जेमतेम राहिली. या तिन्ही आठवड्यांत सरासरी आवक ८ ते १० हजार पेंड्यांपर्यंत राहिली.  मेथीला प्रति शंभर पेंड्यांसाठी ३०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. ५० ते ७० रुपयांच्या किरकोळ फरकाने दर टिकून राहिले. नागपुरात प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये किरकोळ बाजारात २५ ते ३० रुपये किलो असलेल्या मेथीची बाजारात सरासरी आवक १५० क्‍विंटलची आहे. सुरवातीच्या काळात १२०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर असलेल्या मेथीला आता मात्र अवघा ७०० ते १००० रुपये क्‍विंटलचा दर मिळत आहे. दरात मोठे चढ-उतार झाले असले, तरी आवक मात्र स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.  कळमणा बाजार समितीत जानेवारी महिन्यात सरासरी १५० क्‍विंटल मेथीची आवक होत आहे. २ जानेवारी रोजी १२०० ते १५०० क्‍विंटल मेथीची आवक नोंदविण्यात आली. त्यानंतर ८ जानेवारीपर्यंत १५०० रुपयांवर मेथी स्थिर होती. त्यानंतरच्या काळात मात्र मेथीचे दर खाली येण्यास सुरवात झाली. ७०० ते ८०० रुपये क्‍विंटल असे कमीत कमी तर ९०० ते १००० रुपये असा जास्तीत जास्त दर मेथीचा होता. किरकोळ बाजारात मात्र मेथीची विक्री २५ ते ३० रुपये किलोने होत आहे. कळमणा बाजारात लगतच्या मध्य प्रदेश, यवतमाळ, अमरावती व नागपूरच्या काही भागांतून मेथीची आवक होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पुण्यात शेकडा ३०० ते ६०० रुपये गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २५) मेथीच्या सुमारे ५० हजार जुड्यांची आवक झाली हाेती. या वेळी शेकड्याला ३०० ते ६०० रुपये एवढा दर हाेता. सध्या आवक सरासरी असून, दरदेखील सरासरी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत मेथीची आवक वाढल्यास दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.   गेल्या चार दिवसांतील आवक आणि दर (शेकडा/रुपये)  

दिनांक     आवक     किमान     कमाल
२४ जानेवारी  २९,९४१     ३००     ६०० 
२३ जानेवारी ३०,९१६     ३००     ५०० 
२२ जानेवारी  ३१, ४०५     ३००     ६०० 
२१ जानेवारी  ४४, १८४  ३००     ६०० 

जळगावात ६०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील महिनाभरात मेथीला सरासरी ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. या गुरुवारी (ता. २५) आवकेत काहीशी घट झाली. तीस ६०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. आवक ११ क्विंटल झाली.  मेथीची आवक जामनेर, पाचोरा, जळगाव, एरंडोल, धरणगाव, भुसावळ, यावल आदी भागांतून होते. मेथीची लागवड एरंडोल, जामनेर व पाचोरा भागांत अधिक असते. महिनाभर आवक बऱ्यापैकी होती, परंतु शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाले नाहीत. बाजार समितीत शेतकऱ्यांना ५०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाले. यापुढे आवक कमी होईल. त्यामुळे काहीशी दरवाढ होण्याची शक्‍यता आहे, असे संकेत बाजार समितीमधील सूत्रांनी दिले आहेत. बाजार समितीमधील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपयांत)

दिनांक     आवक     किमान     कमाल     सरासरी
२५ जानेवारी १३     ६००     ११००     ६५०
१८ जानेवारी  १२     ४५०     १०००     ७००
११ जानेवारी  १३     ५५०     ११००     ७००
४ जानेवारी     ९    ५००    १०००  ६००

अकोल्यात प्रतिक्विंटल ५०० ते ९०० रुपये गेल्या महिन्यात १२०० ते १८०० पर्यंत विकलेल्या मेथीचे दर आता कमी झाले आहेत. सध्या मेथी ५०० पासून तर ९०० रुपये क्विंटलपर्यंत विकली जात आहे. बहुतांश मेथीचा दर्जा दिवसेंदिवस घसरत असल्याने दरांवरही परिणाम झाला. चांगल्या मेथीची मागणी अधिक होत असल्याने हा दर ८०० ते ९०० पर्यंत राहत आहे. येथील बाजारात अकोला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आवक आहे. दररोज ३० ते ४० क्विंटलपेक्षा अधिक मेथी विक्रीला येत आहे. मेथीची वाढ अधिक झालेली असल्याने दर घसरले आहेत. किरकोळ बाजारात मेथीची १५ ते २५ रुपये किलोदरम्यान विक्री केली जाते. गेल्या महिन्यात मेथीचा दर चांगला होता. सरासरी १५ रुपये किलोपेक्षा अधिक दर मिळत होता. परंतु आता हे दर घसरले आहेत. आवकसुद्धा वाढली आहे. कोल्हापुरात शेकडा ३०० ते ६०० रुपये येथील बाजार समितीत बुधवारी (ता. २४) मेथीस शेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाला. मेथीची नऊ हजार दोनशे जुड्यांची आवक झाली. गेल्या पंधरा दिवसांपासून मेथीची आवक व दर दोन्ही स्थिर आहेत. बाजार समितीत बेळगावबरोबर स्थानिक ठिकाणाहून मेथीची आवक होते. पंधरवड्यापूर्वी मेथीच्या आवकेत काहीशी वाढ होती. यामुळे दर खूपच कमी होते. सध्या नऊ हजारच्या आसपास मेथीची आवक सुरू आहे.    बाजार समितीतील आवक आणि दर (शेकडा/रुपये)

दिनांक     आवक     किमान     कमाल 
२४ जानेवारी     ९२००    ३००      ६००
१७ जानेवारी   १००००      ३००    ५००
१० जानेवारी    १२००    २५० ५००

परभणीत शेकडा १५० ते २५० रुपये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २५) मेथीच्या २५ हजार जुड्यांची आवक होऊन शेकडा १५० ते २५० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.  सध्या येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील सिंगणापूर, इटलापूर, बोरवंड आदी गावांतून मेथीची आवक येत आहे. गुरुवारी (ता. २५) औरंगाबाद जिल्ह्यातून मेथीच्या ६ हजार जुड्यांची आवक झाली होती. गेल्या महिनाभरात मेथीच्या १५ ते ३० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा १५० ते २५० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २५) २५ हजार जुड्यांची आवक झाली होती. घाऊक विक्रीचे दर प्रतिशेकडा १५० ते २५० रुपये होते, तर किरकोळ विक्री प्रतिजुडी ३ ते ५ रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले. बाजार समितीतील आवक व दर (शेकडा/रुपये)  

दिनांक  आवक       किमान    कमाल
४ जानेवारी    २५ हजार    १५०   २०० 
११ जानेवारी  ३० हजार  १५०  २००
१८ जानेवारी   १५ हजार    २००     २५०
२५ जानेवारी २५ हजार     १५०  २५०

सांगलीत शेकडा ४०० ते ४५० रुपये  येथील शिवाजी मंडईत दररोज ४००० ते ५००० मेथी पेंड्यांची आवक होते. बुधवारी (ता. २५) मेथीची ५००० ते ६००० पेंड्यांची आवक झाली असून, त्यास प्रतिशेकडा ४०० ते ४५० रुपये असा दर होता. मेथीची आवक सांगली जिल्ह्यासह शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍यातून आवक होते. गत सप्ताहापेक्षा मेथीची १००० ते१५०० पेंड्यांनी आवक वाढली आहे. मेथीच्या आवकेत वाढ झाली असून दर स्थिर आहेत. अशी माहिती व्यापारी वर्गाने दिली.  बाजार समितीतील आवक व दर (शेकडा/रुपये) 

तारीख  आवक     किमान   कमाल
४ जानेवारी  ३०००     ३५०  ४००
  १२ जानेवारी ३५००    ३५०  ४००
१७ जानेवारी      ३५००      ४००   ४५०
२५ जानेवारी     ४०००    ४००   ४५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com