agriculture news in Marathi, fenugreek arrival increased in nashik, Maharashtra | Agrowon

नाशिकला मेथीची आवक वाढली
ज्ञानेश उगले
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017

नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात मेथीची सरासरी १ लाख २५ हजार जुड्यांची आवक झाली. या वेळी मेथीला प्रतिशेकडा ४०० ते ६०० रुपये व सरासरी ५०० रुपये दर मिळाला. मागील पंधरवड्याच्या तुलनेत आवकेमध्ये ३ पटीने वाढ झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या वातावरण वाढीसाठी पोषक असल्याने मेथीची लागवड इतर ऋतूंच्या तुलनेत वाढते. सध्या मेथीची लागवड वाढल्याने नाशिक मार्केटमध्ये मेथीची आवक वाढली आहे. ऐरवी २५ ते ३० हजार जुड्यांची होणारी आवक तब्बल एक ते सव्वा लाख जुडीपर्यंत पोचली असल्याने मेथीच्या दरात घसरण झाली.

नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात मेथीची सरासरी १ लाख २५ हजार जुड्यांची आवक झाली. या वेळी मेथीला प्रतिशेकडा ४०० ते ६०० रुपये व सरासरी ५०० रुपये दर मिळाला. मागील पंधरवड्याच्या तुलनेत आवकेमध्ये ३ पटीने वाढ झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या वातावरण वाढीसाठी पोषक असल्याने मेथीची लागवड इतर ऋतूंच्या तुलनेत वाढते. सध्या मेथीची लागवड वाढल्याने नाशिक मार्केटमध्ये मेथीची आवक वाढली आहे. ऐरवी २५ ते ३० हजार जुड्यांची होणारी आवक तब्बल एक ते सव्वा लाख जुडीपर्यंत पोचली असल्याने मेथीच्या दरात घसरण झाली.

हिवाळ्याच्या दिवसात सर्वांत जास्त खाल्ली जाणारी पालेभाजी म्हणून मेथीची ओळख आहे. हिवाळ्यातील वातावरण वाढीसाठी पोषक असल्याने मेथीची लागवड इतर ऋतूंच्या तुलनेत वाढते.
खरिपाच्या हंगामातील पिके निघाल्यानंतर सिंचनाची सुविधा असलेल्या भागात पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. विशेषतः दिंडोरी, निफाड, इगतपुरी आदी तालुक्यांत पालेभाज्यांची लागवड वाढते. त्यात हिवाळ्यात वाढती मागणी लक्षात घेऊन मेथीची लागवड केली जाते.

हिवाळ्यात ही पालेभाजी चांगली फोफावत असल्याने तिच्या लागवडीवर भर दिला जातो. यंदा पाऊस चांगला पडलेला आहे. परतीच्या पावसाने खरिपाच्या हंगामातील पिकांचे नुकसान केले असले तरी या पाण्यामुळे विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.

दरम्यान चालू सप्ताहातही मेथीची आवक वाढती राहील व मेथीचे दर गत सप्ताहासारखेच स्थिर राहतील, असा अंदाज बाजार समितीतील सूत्रांनी व्यक्त केला आहे.

मेथीचे दर स्थिर
काढणीस लवकर तयार होणाऱ्या पालेभाज्यांमध्ये मेथीची भाजी इतर भाज्यांच्या तुलनेत चांगली येते. त्यामुळे मेथीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असतो. पावसाळ्यात जास्त पाऊस पडल्यास मेथीचे सडण्याचे प्रमाण वाढते. तसेच काढणीच्या वेळी पाऊस असल्यास काढणी करणे मुश्किल होत असते. उन्हाळ्यात जास्त उन्हाच्या तडाख्यात मेथी पीक जळून जात असल्याने या काळात लागवड कमी होते. सध्या लागवड वाढल्यामुळे मेथीची आवकही वाढली आहे. नाशिक मार्केटमध्ये मागणी स्थिर असल्यामुळे मेथीचे दर स्थिर आहे. किरकोळ विक्रीत मात्र, मेथी १० ते १५ रुपये जुडी अशी विकली जात आहे. बाजार समितीत ४ ते ८ रुपये जुडी असा मेथीला दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...