agriculture news in marathi, Fenugreek in Satara, 1000 to 1500 rupees per hectare in Kothimbiri | Agrowon

साताऱ्यात मेथी, कोथिंबिरीला प्रतिशेकडा १००० ते १५०० रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.१६) मेथी, कोथिंबीर, भेंडी, पावटा, वॅाल घेवडा, काळा घेवडा तेजीत आहे. मेथीच्या १५०० जुड्याची आवक होऊन तिला प्रतिशेकडा १००० ते १५०० असा दर मिळाला. कोथिंबिरीची १८०० जुड्याची आवक झाली. तिला देखील प्रतिशेकडा १००० ते १५०० असा दर मिळाला. मेथी आणि कोथिंबिरीची शेकड्यामागे ३०० रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.१६) मेथी, कोथिंबीर, भेंडी, पावटा, वॅाल घेवडा, काळा घेवडा तेजीत आहे. मेथीच्या १५०० जुड्याची आवक होऊन तिला प्रतिशेकडा १००० ते १५०० असा दर मिळाला. कोथिंबिरीची १८०० जुड्याची आवक झाली. तिला देखील प्रतिशेकडा १००० ते १५०० असा दर मिळाला. मेथी आणि कोथिंबिरीची शेकड्यामागे ३०० रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  

पावट्याची एक क्विंटल आवक, तर दर प्रतिदहा किलो ४०० ते ५०० असा राहिला.  पावट्यास दहा किलो मागे १०० रुपयांची दरवाढ मिळाली. भेंडीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिदहा किलोस २०० ते ३०० असा दर मिळाला. वॅाल घेवड्याची एक क्विंटल आवक झाली असून दहा किलो घेवड्यास ३०० ते ३५० असा राहिला. काळा घेवड्याची दोन क्विंटल आवक झाली असून दहा किलो घेवड्यास ३०० ते ४०० असा दर मिळाला.

भेंडी, वॅाल घेवडा, काळा घेवड्यास दहा किलो मागे शंभर रुपयांची दरवाढ मिळाली. वांग्याची नऊ क्विंटल आवक, तर दर दहा किलोस २०० ते २८० रुपये राहिला. हिरवी मिरचीची ४२ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिदहा किलोस १०० ते १२० असा दर मिळाला. ढोबळी मिरचीची २५ क्विंटल आवक झाली असून तिला प्रतिदहा किलो १५० ते २०० असा दर मिळाला. शेवग्याची आठ क्विंटल आवक होऊन त्याला ३०० ते ४०० असा दर मिळाला. दोडक्याची आठ क्विंटल आवक होऊन दहा किलो दोडक्यास २०० ते २५० असा दर मिळाला. कारल्याची सात क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिदहा किलो १५० ते २०० असा दर मिळाला. ओल्या भुईंमूग शेंगेची १२ क्विंटल आवक झाली असून दहा किलो शेंगेस ३०० ते ४०० असा दर मिळाला.

इतर बातम्या
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
दुष्काळप्रश्‍नी सरकारला धारेवर धरणार...हिंगोली : दुष्काळ जाहीर करण्याच्या जाचक...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
पालखेड आवर्तनाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमयेवला, जि. नाशिक : येवला तालुक्यात दुष्काळाची...
मराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
कापूसटंचाईने कारखानदारांसमोर अडचणी जळगाव ः तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...
अकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला   ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...
अमरावती जिल्ह्यात रब्बीची २८ टक्के पेरणीअमरावती  ः खरीप हंगाम हातून गेला आहे. शेतकरी...
वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करा ः...यवतमाळ  ः वन्यप्राण्यांचा जिव्हाळा...
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...