agriculture news in marathi, fertilizer management of Keshav Khurad, Bhosa, tal. Mehkar, Dist. Buldana | Agrowon

जमिनीचा पोत टिकवण्याकडे कल
चंद्रकांत जाधव
सोमवार, 25 जून 2018

शेतकरी ः केशवराव शालिग्राम खुरद
गाव ः भोसा,
 ता. मेहकर, जि. बुलडाणा
पीक ः संत्रा

शेतकरी ः केशवराव शालिग्राम खुरद
गाव ः भोसा,
 ता. मेहकर, जि. बुलडाणा
पीक ः संत्रा

बुलडाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यातील भोसा शिवारात केशवराव शालिग्राम खुरद काळाची गरज अोळखून शेतीचे व्यवस्थापन सांभाळत अाहेत. जमिनीचा पोत टिकवून उत्पादन घेण्याकडे त्यांचा कल असतो. जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न ते करतात. खरीप, रब्बीत घेतल्या जाणाऱ्या पारंपरिक पिकांचे व्यवस्थापनही फळबागांप्रमाणे काटेकोर करण्यावर त्यांचा भर असतो.
भोसा गाव शिवारात त्यांची ५० एकर शेती आहे. प्रामुख्याने फळशेतीवर त्यांचा जोर अाहे.
सात एकरांत १५ वर्षांपूर्वी लागवड झालेला संत्रा असून, त्यातून दर वर्षी बहार व्यवस्थापन केले जाते. दहा एकरांत नवी लागवड केली अाहे. संत्र्यांची सुमारे ७००, तर डाळिंबांची १४०० झाडे आहेत. मूग पाच ते सहा एकर, उडीद १० एकर असतो. तर, उर्वरित सोयाबीन क्षेत्र असते.

संत्रा बागेतील अन्नद्रव्य व्यवस्थापन (ठळक बाबी)

 • भोसा शिवारातील जमीन लालसर व काहीशी मुरमाड स्वरूपाची अाहे. संत्रा बागेसाठी ही जमीन चांगली समजली जाते. बागेचे खत व्यवस्थापन करण्यापूर्वी खुरद माती परीक्षण महत्त्वाचे समजतात. या जमिनीत गंधक व फॉस्फरस कमी अाढळून येतो. तो भरून काढण्यासाठी सुपर फॉस्फेटचा वापर ते करतात.
 • प्रतिझाडाला शेणखतासोबत किमान पाचशे ग्रॅम सुपर फॉस्फेट दिले जाते.
 • संत्रा बागेला मृग नक्षत्रापूर्वी १० किलो शेणखत, तसेच त्यात चारशे ग्रॅम सुपरफॉस्फेट मिसळून बेसल डोस वर्षातून एकदा दिला जातो.
 • मृगात पाऊस आल्यावर १० ते १५ जूनपर्यंत (वातावरणाचा अंदाज घेत) डीएपी किंवा १०:२६:२६ याचा डोस देतो. यासोबत मिक्स मायक्रोन्यूट्रंट एकरी २० किलो दिले जाते. एका झाडाला सुमारे १०० ग्रॅम एवढी ही मात्रा असते.
 • झाडाची फूट झाल्यानंतर कॅल्शियम अाणि बोरॉनची फवारणी केली जाते. सोबत ०:५२:३४ खताचा वापर केला जातो.
 • फळे १०० ग्रॅम वजनाची होतात तेव्हा १०:२६:२६ हे खत २०० ग्रॅम प्रतिझाड याप्रमाणे दिले जाते. सोबत सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापरही आवश्यकतेनुसार केला जातो.
 • फळांची योग्य वाढ व रंग येण्याच्या दृष्टीने ०:०:५० या खताचा वापर होतो. फवारणीद्वारे पाच ग्रॅम, तर ठिबकद्वारे एकरी चार किलो अाठवड्यातून एकदा त्याचा वापर होतो.
 • फेब्रुवारी महिन्यात फळाला चांगला रंग मिळतो.
 • फेब्रुवारी ते पाच मार्च या काळात काढणी होते. परिसरातील व्यापारी थेट येऊन खरेदी करतात.
 • वर्षातून एकदाच व तोही मृग बहार घेतला जातो.
 • मागील वर्षी तीन एकरांतील एका बागेने समाधानकारक उत्पादन दिले नाही. साधारण चार लाख ५१ हजार रुपयांना ती व्यापाऱ्यांना देण्यात आली.

संपर्क : केशवराव खुरद, ९७६४९१९२४६
 

इतर यशोगाथा
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
बचत गटांमुळे मिळाल्या रोजगाराच्या संधीनेवासा (जि. नगर) येथे नऊ वर्षापूर्वी बारा...
पीक बदलातून शेती केली किफायतशीर...जलसंपदा विभागात कार्यरत असणाऱ्या नारायण अात्माराम...
दर्जेदार गांडूळखताला तयार केले मार्केटकोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगाव (ता. कागल)...
ग्रेडिंग, कोटींगद्वारे संत्र्याचे...सालबर्डी (जि. अमरावती) येथील संत्रा उत्पादक नीलेश...
स्वच्छ, सुंदर, पर्यावरण समृद्ध करंजगावनाशिक जिल्ह्यातील करंजगाव राज्यात ग्रामविकासात...
जरंडीच्या पाटलांनी जोपासली देशी संकरित...राज्यात, देशभरात बहुतांश क्षेत्र बीटी कापसाखाली...
जास्त पावसाच्या प्रदेशात निर्यातक्षम...जास्त पावसाच्या भागात द्राक्षशेती आणि तीही...
तूप, खवा निर्मितीसह उभारली सक्षम...दहावीपर्यंत शिक्षण झालेले. रोजगारासाठी दूध संघात...
मका पिकाला दुग्धव्यवसायाची जोड खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील अरुण व दीपक या...
दर्जेदार शेती अवजारे निर्मितीत उंद्री...बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री गावाने शेती उपयोगी...
विणकर महिलांच्या आयुष्याला पैठणीची...स्वतःमधील क्षमतेची जाणीव झाल्याने 'आम्ही विणकर'...
वडिलांच्या अपंगत्वानंतर धडाडीने सावरली...लोणवाडी (जि. नाशिक) येथील वडील विजय दौंड यांना...
विकासातच नव्हे, तर ‘स्मार्टकामा’तही...उत्तर सोलापूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर)...
दुर्गम गोंदियात एकात्‍मिक शेतीचा आदर्श भाताचे मुख्य पीक आणि दुर्गम प्रदेश अशी गोंदिया...
भूमिहीन मापारी यांची कोकणात कलिंगड शेती मुंबईतील ‘प्रेस’ चा व्यवसाय बंद करून सुरेश मापारी...
दुग्धव्यवसायाला हळद शेतीची जोडआजकाल सुशिक्षित तरुण नोकरीच्या मागे धावतानाच...