agriculture news in marathi, fertilizer management of Vikram Salunkhe, Nagthane, Dist. Satara | Agrowon

सेंद्रिय खतांचा वापर वाढवला
विकास जाधव
सोमवार, 25 जून 2018

शेतकरी ः विक्रम काशिनाथ साळुंखे
गाव ः नागठाणे,  जि. सातारा
पीक ः अाले

शेतकरी ः विक्रम काशिनाथ साळुंखे
गाव ः नागठाणे,  जि. सातारा
पीक ः अाले

सातारा जिल्ह्यातील नागठाणे हे आले पिकासाठी प्रसिद्ध असलेले गाव. येथील विक्रम काशिनाथ साळुंखे हा तरुण शेतकरी. वडिलोपार्जित शेतात आले पीक घेतले जायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्रमने शेती सुरू केली. पारंपरिक आणि आधुनिक शेतीचा मेळ घालण्यास सुरवात केली. कच्चे शेणखत, पाटपाणी, रासायनिक खतांचा जास्त वापर आदीच्या व्यवस्थापनामुळे हुमणी, कंदकुज होऊन आले पिकाचे नुकसान होत होते. हे टाळण्यासाठी तंत्रात बदल व सेंद्रिय खतांचा वापर वाढविला. यामुळे भांडवली खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होण्याबरोबच जमिनीची सुपीकता वाढवली आहे.

असे आहे शेतीचे नियोजन

 • आले लागवडीसाठी निचरा होणाऱ्या हलकी ते मध्यम प्रकारातील जमिनीची निवड केली जाते.
 • लागवड करण्यापूर्वी त्या क्षेत्रात तीन महिने अाधी हिरवळीची खते उदा. ताग, धैंचा घेऊन ते गाडले जातात.
 • यानंतर उभी- आडवी नांगरट करून क्षेत्र तापण्यासाठी ठेवले जाते.
 • एक एकर क्षेत्रासाठी पाच ट्रेलर शेणखत व पाच ट्रेलर कंपोस्ट खत वापरण्यात येते. खते जमिनीत एकरूप होण्यासाठी पुन्हा नांगरट केली जाते.
 • मे किंवा जून महिन्यात (तापमान पाहून) आले पिकाची लागवड केली जाते.
 • ‘बेड’ तयार केल्यानंतर त्यावर निंबोळी पेंड, हुमणी प्रतिरोधक कीटकनाशक यांचा वापर होतो.
 • बियाण्यास जैविक आणि रासायनिक प्रक्रिया केली जाते.
 • त्यानंतर या बेडवर दोन किंवा तीन कुडी लागवड केली जाते.
 • एकरी दोन कुडीने एक टन बियाण्याचा वापर केला जातो.
 • लागवडीनंतर आळवणी दिले जाते.
 • ढगाळ वातावरण, तसेच पावसाळ्यात शेतात पाणी साचले जाऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते.
 • पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जातो.
 • प्रत्येक आठवड्याला जीवामृताच्या स्लरी, तसेच फवारण्या केल्या जातात.
 • रासायनिक खतांचा कमी वापर केला जातो.
 • एकूण व्यवस्थापनातून आले पिकाचे एकरी २० टन, तर खोडवा ठेवल्यास २५ टनांपर्यंत उत्पादन घेतले जाते. गेल्यावर्षी प्रतिटन ४० हजार रुपये दर मिळाला.

संपर्क : विक्रम साळुंखे - ९१५८०१९१११

 

इतर यशोगाथा
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथबोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर...
'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल...जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
बचत गटांमुळे मिळाल्या रोजगाराच्या संधीनेवासा (जि. नगर) येथे नऊ वर्षापूर्वी बारा...
पीक बदलातून शेती केली किफायतशीर...जलसंपदा विभागात कार्यरत असणाऱ्या नारायण अात्माराम...
दर्जेदार गांडूळखताला तयार केले मार्केटकोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगाव (ता. कागल)...
ग्रेडिंग, कोटींगद्वारे संत्र्याचे...सालबर्डी (जि. अमरावती) येथील संत्रा उत्पादक नीलेश...
स्वच्छ, सुंदर, पर्यावरण समृद्ध करंजगावनाशिक जिल्ह्यातील करंजगाव राज्यात ग्रामविकासात...
जरंडीच्या पाटलांनी जोपासली देशी संकरित...राज्यात, देशभरात बहुतांश क्षेत्र बीटी कापसाखाली...
जास्त पावसाच्या प्रदेशात निर्यातक्षम...जास्त पावसाच्या भागात द्राक्षशेती आणि तीही...
तूप, खवा निर्मितीसह उभारली सक्षम...दहावीपर्यंत शिक्षण झालेले. रोजगारासाठी दूध संघात...