agriculture news in marathi, fertilizer prices rise by 20 percent | Agrowon

खतांच्या किमतीत २० टक्के वाढ
वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे यंदाच्या खरिपात खतांच्या किमतीत सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. स्फुरद आणि पालाशजन्य खतांच्या किमतीवर थेट परिणाम झालेला आहे. तर सरकारी नियंत्रणामुळे युरिया खताच्या किमती स्थिर असल्या तरी सरकारतर्फे खत उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करावी लागणार आहे.

कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे यंदाच्या खरिपात खतांच्या किमतीत सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. स्फुरद आणि पालाशजन्य खतांच्या किमतीवर थेट परिणाम झालेला आहे. तर सरकारी नियंत्रणामुळे युरिया खताच्या किमती स्थिर असल्या तरी सरकारतर्फे खत उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करावी लागणार आहे.

जागतिक पातळीवर कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढून खतांच्या किमती वधारल्या आहेत. डाय अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खताच्या किमतीत रब्बी हंगामाच्या तुलनेत २० टक्के वाढ झाली आहे. डीएपी खताची ५० किलोची पिशवी १२९० रुपयांना झाली आहे. तर म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी) खताच्या किमतीत १३ टक्के वाढ होऊन प्रतिपिशवी ७०० रुपये झाली आहे. 

युरिया खताच्या किमती सरकार निश्चित करत असल्याने त्याच्या किमती वाढणार नाहीत. परंतु अनुदानापोटी खत उत्पादक कंपन्यांना द्यावयाच्या रकमेत वाढ होईल. याचा अर्थ युरिया खताच्या किमतीतील वाढीचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे.   

खतांच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे खत उद्योगातील जाणकारांचे मत आहे. खतांच्या किमतीत मोठी वाढ होऊनही समाधानकारक मॉन्सूनचा अंदाज आणि खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत मोठी वाढ होण्याची अपेक्षा यामुळे खतांच्या मागणीत फार घट होण्याची शक्यता नाही, असे मानले जात आहे.
कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार देशात यंदाच्या खरीप हंगामासाठी एकूण १५८ लाख टन युरिया, ४९.२ लाख टन डीएपी, २०.२५ लाख टन एमओपी, ४९.७३ लाख टन एनपीके आणि २६.२५ लाख टन सिंगल सुपर फॉस्फेट इतकी गरज आहे. खतांची उपलब्धता पाहता ही गरज पूर्ण होण्यात काही अडचण येणार नाही, असे कृषी मंत्रालयातल्या अधिकाऱ्याने सांगितले. 

इतर अॅग्रोमनी
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...
भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...
सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...
चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील...जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख...
कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...
हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...
कापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...
भात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...
मका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...
अर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...
कापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...
सातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...
हळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...