agriculture news in marathi, fertilizer stock status, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात एक लाख बारा हजार टन खते उपलब्ध
टीम अॅग्रोवन
रविवार, 10 जून 2018

नगर  ः खरीप हंगामासाठी जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख १२ हजार १६७ टन खत उपलब्ध झाले आहे. खरिपासाठी कृषी विभागाने यंदा २ लाख ९३ हजार २४४ मेट्रिक टन खतांची मागणी केली आहे. त्यापैकी २ लाख १ हजार ४३० टन खतांचे आवंटन मंजूर झालेले आहे.

नगर  ः खरीप हंगामासाठी जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख १२ हजार १६७ टन खत उपलब्ध झाले आहे. खरिपासाठी कृषी विभागाने यंदा २ लाख ९३ हजार २४४ मेट्रिक टन खतांची मागणी केली आहे. त्यापैकी २ लाख १ हजार ४३० टन खतांचे आवंटन मंजूर झालेले आहे.

जिल्ह्यात खरिपाचे सुमारे ४ लाख २४ हजार ४९६ हेक्‍टर क्षेत्र ग्राह्य धरून नियोजन केले जात आहे. मागील काही काळात खताची टंचाई लक्षात घेऊन अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी उपाययोजना केल्या जातात. गेल्यावर्षी २ लाख ७४ हजार ०६० टन खतांची मागणी केली होती. त्यापैकी १ लाख ८५ हजार ७०० टन खताचे आवंटन मंजुर केले होते. त्यापैकी १ लाख ७४ हजार ०४० टन खत उपलब्ध झाले होते. यंदा गतवर्षीच्या तुलनेत १९ हजार १७८ टन जास्त म्हणजे २ लाख ९३ हजार २४४ टन खतांची मागणी केली.

यंदा गतवर्षीपेक्षा १६ हजार टन जास्त म्हणजे २ लाख १ हजार ४३० खताचे आवंटन मंजूर झालेले असून आतापर्यंत १ लाख १२ हजार १६७ टन खत उपलब्ध झाले आहे. पावसाला सुरवात झाली असली तरी अजून पेरणी, कापूस लागवडीएवढा पाऊस नाही.
पेरणी, लागवडीची घाई करु नये असे हवामान विभागाने आवाहन केले आहे. त्यामुळे अजून खतांच्या खरेदीसाठीही बाजारात फारशी गर्दी आणि उत्साह दिसत नाही. खताबाबत अजिबात अडचण येणार नाही असे कृषी विभागातून सांगितले आहे.

इतर ताज्या घडामोडी
वीरगळचा इतिहास नव्या पिढीसमोरकोल्हापूर - या दगडी शिळा अनेक गावांत पाराखाली,...
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...