agriculture news in marathi, fertilizer supply status, jalgon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात खतपुरवठा कमीच
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 डिसेंबर 2017
जिल्ह्यातील खतांचा साठा मुबलक आहे. आम्ही खतसाठा पॉइंटची पाहणी केली आहे. खतपुरवठा ही बाब खत कंपन्यांच्या हातात आहे. आपला पाठपुरावा त्यासाठी असतो. 
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जळगाव.
जळगाव : जिल्ह्यात युरियाचा या महिन्यातील पुरवठा मंजूर लक्ष्यांकाच्या तुलनेत कमी असून, बुधवार (ता. २१) अखेर एकूण ५७ टक्के पुरवठा झाला आहे. तसेच इतर खतांचा पुरवठाही कमीच आहे. परंतु जिल्ह्यात खरिपातील शिल्लक खते व या हंगामात पुरवठा झालेली खते मिळून मुबलक प्रमाणात खते उपलब्ध आहेत. संयुक्त व सरळ खते मिळून २२ हजार २०६ मेट्रिक टन खते उपलब्ध असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने म्हटले आहे. 
 
रब्बी हंगामाचा निम्म्यापेक्षा अधिक कालावधी निघून गेला आहे. जिल्ह्यात केळीसह मका, गव्हाला खते अधिक लागतात. तसेच हरभऱ्याचीही अपेक्षेपेक्षा अधिक पेरणी झाल्याने त्यासाठीही खतांची मागणी आहे. रब्बीसाठी एकूण ८६ हजार मेट्रिक टन युरिया, ५३ हजार ३०० मेट्रिक टन सुपर फॉस्फेट, २९ हजार मेट्रिक टन पोटॅश आणि ११ हजार १०० मेट्रिक टन डीएपीचा पुरवठा अखेरपर्यंत होईल, असे कृषी आयुक्‍तालयाने म्हटले आहे.
 
डिसेंबरअखेरपर्यंत २५ हजार ८०० मेट्रिक टन युरियाचा पुरवठा अपेक्षित होता, बुधवारपर्यंत यातील १४ हजार ६२० मेट्रिक टन पुरवठा झाला आहे. तसेच १२ हजार ८१६ मेट्रिक टन सुपर फॉस्फेटचा पुरवठा अपेक्षित असून, बुधवारपर्यंत पाच हजार ७७३ मेट्रिक टन पुरवठा झाला. पोटॅशचा ६९६० मेट्रिक टन पुरवठा अपेक्षित होता. या तुलनेत कमी म्हणजेच चार हजार ६९७ मेट्रिक टन पुरवठा झाला आहे. 
 
डीएपीचा दोन हजार ६६४ मेट्रिक टन पुरवठा व्हायला हवा, पण यातील १७८० मेट्रिक टन पुरवठा झाला आहे. संयुक्त खतांचा एकूण ११ हजार ३१६ मेट्रिक टन पुरवठा अपेक्षित होता, पैकी पाच हजार ६२४ मेट्रिक टन खतपुरवठा झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून मिळाली. हा पुरवठा कमी दिसत असला तरी खरिपातील खते शिल्लक आहेत. शिवाय ज्या खतांचा पुरवठा झाला त्यांची पूर्णतः विक्री झालेली नाही. खते शिल्लक असल्याने टंचाई नाही. मुबलक खते असल्याचा दावा कृषी विभागाने केला.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...