agriculture news in marathi, fertilizers and seeds planning for kharip, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगावमध्ये तीन लाख ४० हजार टन खतांची मागणी
टीम अॅग्रोवन
रविवार, 15 एप्रिल 2018
खरीप हंगामासंबंधी बियाणे व खतांची तयारी केली असून, मागणी नोंदणी यापूर्वीच करण्यात आली आहे. लवकरच मागणी मंजुरी प्राप्त होईल. यानंतर नेमके किती बियाणे व खते येतील, हे स्पष्ट होईल. 
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव.
जळगाव : कृषी विभागाने जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. त्यात यंदा तीन लाख ४० हजार मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली आहे. खते मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावीत, यासाठी मागणी अधिक केली असून, खत वितरण लक्ष्यांक अजून मंजूर झालेला नाही. परंतु यंदा खतांची कोणतीही टंचाई नसणार, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने म्हटले आहे. 
 
जिल्ह्यात यंदा सुमारे साडेसात लाख हेक्‍टरवर खरीप हंगाम उभा राहील, असा अंदाज आहे. कापसाखालील क्षेत्र सर्वाधिक चार लाख ६५ हजार हेक्‍टरपर्यंत असू शकते. परंतु कापसाखालील क्षेत्रात घट होईल, असे तज्ज्ञ व जाणकार यांचे म्हणणे आहे. यापाठोपाठ तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्यवर्गीय पिकांची पेरणी होईल.
 
जिल्ह्यात खतांचा सर्वाधिक वापर केला जातो. ही बाब लक्षात घेता बियाण्यांप्रमाणे खतांचेही नियोजन कृषी विभागाने केले आहे. या संदर्भातील माहिती नुकत्याच झालेल्या खरीप आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील व इतर वरिष्ठांना कृषी विभागाने दिली. युरियाची मागणी अधिक असते. त्यामुळे युरियाचा सर्वाधिक पुरवठा करून घेण्याकडे कृषी विभागाचा कल असणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. तशी युरियाची सर्वाधिक मागणीही केली असून, जेवढी मागणी केली, तेवढा पुरवठा करून घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

जिल्ह्यात बीटी कापसाची लागवड ९० टक्‍क्‍यांवर असते. ही बाब लक्षात घेता यंदा २२ लाख २९ हजार २०२ पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. खासगी बियाणे पुरवठादार कंपन्या हा पुरवठा करतील. नॉन बीटीची ८६ हजार ९४३ पाकिटे मिळावीत, यासाठी मागणीपत्र तयार केले आहे. रावेर, यावल व जामनेर भागांत नॉन बीटीची लागवड अधिक केली जाते, अशी माहिती मिळाली.

अमळनेर, जामनेर, चोपडा या तालुक्‍यांमध्ये कापसाची सर्वाधिक लागवड होईल. पूर्वहंगामी कापसाखाली क्षेत्र यंदा सुमारे एक लाख हेक्‍टरपर्यंत राहू शकते, असा अंदाज आहे. तर  कडधान्य, गळितधान्य, तृणधान्य आदी पिकांसाठी ४६ हजार ७७४ क्विंटल बियाण्यांची मागणी खासगी बियाणे कंपन्या, महाबीज आणि राष्ठ्रीय बियाणे मंडळाकडे करण्यात आली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...