agriculture news in Marathi, fertilizers wile be sold on subsidy from November, Maharashtra | Agrowon

राज्यात नोव्हेंबरपासून अनुदानित खतांची विक्री
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

मुंबई: राज्यात एक नोव्हेंबरपासून अनुदानित खतांची विक्री पॉइंट ऑफ सेल (पीओएस) मशिनच्या माध्यमातून करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या माध्यमातून खतांची विक्री करणारे महाराष्ट्र हे देशातील मोठ्या राज्यांपैकी पहिले राज्य ठरणार आहे. पुढील तीन दिवस विशेष मोहीम घेऊन खतांचा साठा पीओएस मशिनवर नोंदविण्यात येणार आहे. पीओएस मशिनद्वारे विक्री केलेल्या खतांवरच अनुदान देय राहील. यासाठी आधार क्रमांक बंधनकारक आहे, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.

मुंबई: राज्यात एक नोव्हेंबरपासून अनुदानित खतांची विक्री पॉइंट ऑफ सेल (पीओएस) मशिनच्या माध्यमातून करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या माध्यमातून खतांची विक्री करणारे महाराष्ट्र हे देशातील मोठ्या राज्यांपैकी पहिले राज्य ठरणार आहे. पुढील तीन दिवस विशेष मोहीम घेऊन खतांचा साठा पीओएस मशिनवर नोंदविण्यात येणार आहे. पीओएस मशिनद्वारे विक्री केलेल्या खतांवरच अनुदान देय राहील. यासाठी आधार क्रमांक बंधनकारक आहे, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.

शुक्रवारी (ता. २७) मध्यरात्रीपासून राज्यात परवानाधारक अनुदानित खत विक्रेत्यांकडे शिल्लक असलेल्या खतांच्या साठ्याचा हिशेब करून त्यांची नोंद पीओएस निगडित संगणकीय प्रणालीवर आणणे आवश्‍यक करण्यात आले आहे. त्यासाठी २८, २९, ३० ऑक्‍टोबर रोजी विशेष मोहीम राबवून खतांचा साठा पीओएस मशिनमध्ये नोंदविला जाणार आहे. यासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी वितरक मशिन घेऊन येणार असून, नोंदीची मोहीम राबविली जाणार आहे. 

राज्यात २० हजार ९८८ अनुदानित खत वितरक असून, त्यांना प्रत्येकाला पीओएस मशिन मोफत वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे ६० लाख मेट्रिक टन अनुदानित खतांची विक्री होते. त्यामध्ये खरीप हंगामात ३३ लाख मेट्रिक टन आणि रब्बी हंगामात २७ लाख मेट्रिक टनांची उलाढाल होते. एक नोव्हेंबरपासून या मशिनच्या माध्यमातूनच अनुदानित खतांची विक्री बंधनकारक करण्यात आली आहे. अनुदानित खते खरेदी करताना शेतकऱ्यांना आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. खत खरेदीसाठी शेतकऱ्याने दुसऱ्या व्यक्तीस पाठवले तर त्याचाही आधार क्रमांक नोंदविण्यात येणार आहे. या खताचे अनुदान संबंधित कंपनीच्या खात्यावर थेट जमा होणार आहे. 

इतर अॅग्रो विशेष
जगभरात अवशेषमुक्त मालालाच मागणीपुणे : निर्यातीत युरोपीय देशांप्रमाणे अन्य...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी :...नवी दिल्ली  : २०१९ मध्ये सत्तेत आल्यास...
त्रिगुणी म्हशीची विजयी पताकाजगात सर्वप्रथम हॅंड गाईडेड क्लोनिंग म्हणजे हस्त...
जाणिवेचा लॉंग मार्चशेतकरी संपामुळे सरकारला कर्जमाफीची घोषणा...
विदर्भात विस्तारतो आहे पोल्ट्री व्यवसायकडक उन्हाळ्यामुळे पोल्ट्री व्यवसाय विदर्भामध्ये...
तुरळक पावसाचा अंदाज; तापमान वाढणारपुणे : राज्यात सोमवारी (ता. १९) मध्य महाराष्ट्र,...
कृषी योजनांचा निधी खर्च करण्यात अपयशपुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांचा निधी...
शेतकरी आत्महत्यांचे सरकारला काहीच वाटत...राळेगणसिद्धी, जि. नगर : ‘‘लोकपाल आणि लोकायुक्त...
कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत व्याज माफ;...बारामती, पुणे ः "छत्रपती शिवाजी महाराज...
अवजारांची गुणवत्ता हाच बनलाय ब्रॅंडगिरणारे (जि. नाशिक) गावातील पिंकी सुधाकर पवार...
‘तेर` करतेय पर्यावरण, शिक्षण अन्‌ सौर...पुणे येथील ‘तेर पॉलिसी सेंटर` या स्वयंसेवी...
'कृषी उद्योग'मधील वादग्रस्त सूर्यगण...पुणे : महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळातील...
‘फॉस्फोनिक ॲसिड’च्या आढळाने ‘सॅंपल फेल’...पुणे : डाळिंब पिकात केवळ सातच लेबल क्लेम...
बोंड अळी, धान नुकसानग्रस्तांना मदतीसाठी...पुणे : बाेंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान...
बेदाण्याचे यंदा तीस टक्केच उत्पादनसांगली : राज्यात दरवर्षी सुमारे २ लाख टन...
हमीभावाच्या मुद्द्यावरून गैरसमज पसरवले...नवी दिल्ली : उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक...पुणे : राज्यावर अवकाळीचे ढग असल्याने पावसाचे सावट...
आसामी रेडकाचा ‘क्लोन’ यशस्वीहिस्सार, हरियाणा : येथील केंद्रीय म्हैस संशोधन...
राज्यात १५ लाख टन साखर उत्पादन वाढलेकोल्हापूर : राज्यात सुरू हंगामात यंदा अंदाजपेक्षा...