agriculture news in marathi, Fifty lakh people got loan from mudra scheme | Agrowon

पन्नास लाख जणांना मुद्रा योजनेत कर्जवाटप
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 जानेवारी 2018

मुंबई : देशातील आर्थिक विषमता दूर करण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी सुरू केलेली मुद्रा बँक योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. योजनेतून मागील दोन वर्षांत ५० लाख ३८ हजार जणांना कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यापुढील काळातही ही योजना प्रभावीपणे राबवून बेरोजगारांचे जीवनमान बदलण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी या वेळी सांगितले.

मुंबई : देशातील आर्थिक विषमता दूर करण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी सुरू केलेली मुद्रा बँक योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. योजनेतून मागील दोन वर्षांत ५० लाख ३८ हजार जणांना कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यापुढील काळातही ही योजना प्रभावीपणे राबवून बेरोजगारांचे जीवनमान बदलण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी या वेळी सांगितले.

मंत्री मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे मुद्रा बँक योजनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीची बैठक झाली. या वेळी मुनगंटीवार म्हणाले, की गोरगरिबांना विनातारण आणि विनाजामीन कर्ज मिळावे यासाठी मुद्रा बँक योजना सुरू केली आहे. योजनेतून २०१६-१७ मध्ये १६.९ हजार कोटी रुपयांचे, तर २०११७-१८ मध्ये आतापर्यंत ८.८ हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. २०१६-१७ मध्ये ३३ लाख ४४ हजार, तर २०१७-१८ मध्ये आतापर्यंत १६ लाख ९३ हजार इतक्या बेरोजगारांना या योजनेतून व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले आहे. यापुढील काळातही मिशन मोडवर ही योजना राबवून जास्तीत जास्त बेरोजगारांना कर्ज आणि कोशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईल, असे त्यांनी या वेळी सांगितले.

नोकरी देणाऱ्यांची संख्या वाढावी
नोकरी मागणाऱ्या हातांपेक्षा नोकरी देणाऱ्या हातांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. या धोरणातूनच पुढे आलेल्या या योजनेला अधिक प्रभावी करण्यासाठी त्याची कौशल्य विकास विभाग, स्टार्टअप योजना, बचत गटविषयक विविध योजना यांच्याशी सांगड घालून पुढील आर्थिक वर्षातही ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे मुनगंटीवार म्हणाले.

बैठकीस आमदार अनिल सोले, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी. के. जैन, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, कौशल्य विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, आयटी सचिव श्रीनिवासन, एसएलबीसीचे समन्वयक श्री. मस्के, ग्रामीण जीवनोन्नती कार्यक्रमाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्यासह मुद्रा बँक योजनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीचे विविध सदस्य आदी उपस्थित होते.

योजनेचा उद्देश आर्थिक विषमता दूर करणे हा आहे. त्यासाठी राज्यातील विशेषतः मागास जिल्ह्यांतही योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. योजनेंतर्गत प्रशिक्षण, कार्यशाळा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यावरही भर देण्यात यावा.
-सुधीर मुनगंटीवार, वित्त आणि नियोजनमंत्री

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...