agriculture news in Marathi, fig plants not fruiting in Pune District, Maharashtra | Agrowon

अंजिराच्या झाडांना फुटवे फुटलेच नाहीत
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

गेल्या वर्षी मला  अंजिराच्या ५० झाडांतून 
एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळायचे. या वर्षी पानगळ झाल्याने अंजिराची फळे पोसणार नाहीत. त्यामुळे या वर्षी अंजिराच्या पिकातून काहीही उत्पन्न मिळणार नसून, केलेला खर्च अंगावर येणार आहे. त्यामुळे कृषी विभागाने नुकसान झालेल्या अंजीर बागांचे पंचनामे करावेत.
- अंकुश शिंदे, अंजीर उत्पादक शेतकरी, वेळू
 

खेड-शिवापूर, जि. पुणे : बदलत्या हवामानाचा फटका या वर्षी गोगलवाडी (ता. हवेली) आणि वेळू (ता. भोर) भागातील अंजिराच्या बागांना बसला आहे. या पट्ट्यातील सुमारे ६० टक्के बागांतील झाडांना फुटवे फुटलेले नसून मोठ्या प्रमाणात पानगळती झाली आहे. त्याचा परिणाम या पट्ट्यातील मीठा अंजिराच्या उत्पादनावर होणार आहे, त्यामुळे अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे.

गोगलवाडी आणि वेळू या गावात अंजिराचा मीठा बहर धरला जातो. या भागातील अंजिराचे उत्पादन साधारणतः जानेवारी ते जून या दरम्यान मिळते. मात्र, या वर्षी नोव्हेंबर महिन्यात असलेले ढगाळ वातावरण, मोठ्या प्रमाणात पडलेले दव आणि हवामानात सारखा होत असलेला बदल याचा अंजिराच्या बागांना फटका बसला आहे. 

बदलत्या हवामानामुळे अंजिराच्या झाडांना चांगला फुटवा फुटलेला नाही. तसेच सुमारे ६० टक्के बागांतील झाडांची पानगळती झाली आहे. विशेषतः अंजिराच्या जुन्या बागांची पानगळती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्याचा परिणाम अंजिराच्या उत्पादनावर होण्याची शक्‍यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी तर बागा सोडून दिल्या आहेत. अनेकांनी केलेला खर्चही भरून निघण्याची शक्‍यता नाही.

हवामानबदलाचा मोठा परिणाम अंजिराच्या पिकांवर झाला आहे. परिसरातील काही मोजक्‍याच बागा चांगल्या स्थितीत असून ६० टक्के अंजिराच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या वर्षी अंजिराच्या पिकावर अवलंबून असलेले आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे शेतकरी गणेश गोगावले, नितीन गोगावले यांनी सांगितले. 

पाणी आहे; पण हवामानाची साथ नाही
दरवर्षी अंजिराच्या पिकाला पाण्याचा तुटवडा भासतो. या वर्षी मात्र परतीचा पाऊस दमदार झाल्याने पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे अंजिराचे उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, या वर्षी हवामानाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...