Agriculture News in Marathi, fight against govt policy, cotton soyabean paddy summit at Akola | Agrowon

सरकारविरोधात आता सामूहिक लढ्याची गरज
टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 डिसेंबर 2017
अकोला  ः शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र व राज्य ही दोन्ही सरकारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत अाहे. या विरुद्ध सामूहिक लढ्याची गरज निर्माण झाल्याचा सूर रविवारी (ता.३) येथे झालेल्या कापूस-सोयाबीन-धान परिषदेत उमटला. 
 
जागर मंचाच्या पुढाकाराने येथील स्वराज्य भवन परिसरात झालेल्या या परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, माजी अामदार शंकरअण्णा धोंडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, प्रशांत गावंडे, गजानन अमदाबादकर, मनोज तायडे, कैलास फाटे, श्रीकांत पिसे, गजानन तात्या कृपाळ अादी उपस्थित होते.
अकोला  ः शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र व राज्य ही दोन्ही सरकारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत अाहे. या विरुद्ध सामूहिक लढ्याची गरज निर्माण झाल्याचा सूर रविवारी (ता.३) येथे झालेल्या कापूस-सोयाबीन-धान परिषदेत उमटला. 
 
जागर मंचाच्या पुढाकाराने येथील स्वराज्य भवन परिसरात झालेल्या या परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, माजी अामदार शंकरअण्णा धोंडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, प्रशांत गावंडे, गजानन अमदाबादकर, मनोज तायडे, कैलास फाटे, श्रीकांत पिसे, गजानन तात्या कृपाळ अादी उपस्थित होते.
 
या परिषदेत विविध ठराव मंजूर करण्यात अाले. या वेळी मार्गदर्शन करताना रविकांत तुपकर म्हणाले, की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अाता ऊस उत्पादकांप्रमाणे कापूस, सोयाबीन, धान उत्पादकांनी एकत्र अाले पाहिजे. सध्याचे दोन्ही सरकारे फसवणूक करणारे अाहे. विदर्भ ही चळवळीची भूमी अाहे; परंतु अाता विदर्भात अांदोलने संपली. मात्र इथल्या अांदोलनाचा अादर्श उर्वरित महाराष्ट्राने घेतला. अाज तेथील शेतकरी एकत्र येतो, रस्त्यावर उतरतो. त्याला न्याय मिळत अाहे. अापल्यालाही असेच एकत्र यावे लागेल.
 
शासनाने अापल्याला कर्जमाफी दिली. मात्र इतक्या अटी लादल्या की त्याचा लाभ कमी व त्रास अधिक झाला. अाता प्रत्येक गोष्टीसाठी अाॅनलाइन अर्ज भरण्यास सांगितले जाते. सध्या कुठल्याच शेतमालाला भाव नाही. अशी परिस्थिती असतानाही अायात केली जाते. वास्तविक सोयाबीनचा दरवाढण्यासाठी शासनाने पामतेलावर ४० टक्के अायात शुल्क लावले पाहिजे होते. बोंडअळीने कापूस पीक ७० टक्क्यांवर नष्ट झाले.
 
शासनाने या उत्पादकांना १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी. जर शासन हे करणार नसेल तर ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक अाहे, असा अारोप करत श्री. तुपकर यांनी शासनावर चौफेर टिका केली.
 
हे सरकार एेकण्यापलीकडे गेले ः धोंडगे
श्री. धोंडगे यांनीही सरकारच्या धोरणांवर टीका केली. हे सरकार एेकण्यापलीकडे गेले. त्यांना कुठलीच गोष्ट एेकायची नाही. जर अापले प्रश्न सोडवायचे असतील तर एकत्र अाले पाहिजे. सध्या कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद उत्पादन घेणारे सर्वच शेतकरी अडचणीत अाहेत, असे श्री. धोंडगे म्हणाले. 
 
गजानन अमदाबादकर यांनी क्रांतीकारी अांदोलनाची गरज व्यक्त करीत तरुणपिढीने रस्त्यावर यायला हवे असे सांगितले. रशांत गावंडे यांनी ठराव वाचन केले.  
 
परिषदेत मंजूर झालेले प्रमुख ठराव
  •  नाफेडने खरेदी मर्यादा वाढवावी.
  •  कापूस उत्पादकांना ५० हजार रुपये भरपाई द्या.
  •  फार्मर इन्कम इन्शुरन्स स्कीम लागू करा
  •  अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा
  •  सावकारग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

इतर ताज्या घडामोडी
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...