agriculture news in marathi, fight will continue till farmers gets Government declared milk rate | Agrowon

दुधाला जाहीर दर मिळेपर्यंत संघर्ष : संघर्ष समिती
टीम अॅग्रोवन
बुधवार, 9 मे 2018

मुंबई : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत सरकारने दूधप्रश्नी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या या सकारात्मकतेचे संघर्ष समिती स्वागत करीत आहे. सरकारने दूध भुकटी बनविणारे दूध संघ व खासगी संघांना ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत तोकडे असल्याने सरकारने दुधाला जाहीर केलेला दर मिळाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही, असे संघर्ष समितीने जाहीर केले आहे.

मुंबई : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत सरकारने दूधप्रश्नी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या या सकारात्मकतेचे संघर्ष समिती स्वागत करीत आहे. सरकारने दूध भुकटी बनविणारे दूध संघ व खासगी संघांना ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत तोकडे असल्याने सरकारने दुधाला जाहीर केलेला दर मिळाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही, असे संघर्ष समितीने जाहीर केले आहे.

राज्यभरात संघटीत क्षेत्रात संकलित होणाऱ्या एकूण एक कोटी तीस लाख लिटर दुधापैकी साधारणतः चाळीस लाख लिटर दूध पावडर बनविण्यासाठी वापरण्यात येते. सरकारने या पावडरला लिटरमागे तीन रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पावडरचे कोसळलेले दर व दिलेल्या अनुदानामुळे होणाऱ्या फायद्याची तुलना करता सरकारच्या या तुटपुंज्या अनुदानाने दूध पावडरच्या निर्मितीमध्ये नव्याने मोठी वाढ होईल, याची खात्री नाही. मागील अनुभव पाहता पूर्वीच गोदामांमध्ये असलेल्या पावडरीवर नवे अनुदान लाटण्याचे प्रकार होणार नाहीत, याचीही खात्री नाही. अशा परिस्थितीत पावडरला अनुदान देण्याचा सरकारचा हा निर्णय अत्यंत तोकडा असल्याचे संघर्ष समितीचे मत आहे. 

सरकारच्या या निर्णयामुळे १७ रुपयांवर गेलेले दुधाचे दर २७ रुपयांवर जाण्याची शक्यता संघर्ष समितीला वाटत नाही. कर्नाटक सरकारच्या धर्तीवर सरळ दूध उत्पादकांना त्यांच्या खात्यावर प्रतिलिटर अनुदान वर्ग करणे, हाच प्रभावी मार्ग आहे. सरकारने असे न करता संघ व कंपन्यांना अनुदान देऊन पुन्हा एकदा विषाची परीक्षा पाहण्याचा निर्णय घेतला आहे. 

दूध पावडरबाबत निर्णय घेत असताना घरगुती वापरासाठी वित.िरत होणाऱ्या उर्वरित ९० लाख लिटर दुधाबाबत मात्र सरकारने अद्याप कोणतेही पाऊल उचललेले नाही. पिशव्यांमधून घरोघर पुरवठा होणाऱ्या या ९० लाख लिटर दुधाला शहरातील ग्राहक ४२ रुपयांपेक्षा अधिक रुपये मोजत आहेत. शेतकऱ्यांना मात्र यापैकी केवळ १७ रुपये पोचत आहेत. शेतकरी ते ग्राहक या साखळीमध्ये अमाप पैसा जिरतो आहे. या साखळीत सुधारणा करून शेतकऱ्यांना घामाचे योग्य दाम व ग्राहकांना रास्त दरात विषमुक्त व भेसळमुक्त दूध मिळावे, यासाठी ठोस हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. सरकारने याबाबत कोणतेही पाऊल उचललेले नाही.

दुग्ध पदार्थांच्या निर्मिती व विक्रीमध्येही अमाप नफा कमविला जातो. ग्राहक व शेतकरी या दोघांचीही लूट यामध्ये होते आहे. दुधाला रास्त दर मिळावा व ग्राहकांना रास्त दरात दूध व दुग्ध पदार्थ मिळावेत, यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. सरकारने या पातळीवरही अद्याप कोणतीही पावले उचललेली नाहीत. 
अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना जोपर्यंत ३.५ आणि ८.५ गुणवत्तेच्या दुधाला जाहीर केल्याप्रमाणे २७ रुपये दर मिळत नाही, तोवर संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्णय संघर्ष समिती जाहीर करीत आहे.

संघर्ष समितीमध्ये सामील शेतकरी संघटना, शेतकरी कार्यकर्ते, पहिला ठराव घेणाऱ्या लाखागंगा गावचे ग्रामस्थ व राज्यभरातील सर्व दूध उत्पादकांशी व्यापक संपर्क करून आंदोलनाची पुढील रणनीती ठरविण्यात येईल, असे संघर्ष समितीच्या वतीने डॉ. अजित नवले, धनंजय धोर्डे, दिगंबर तुरकने, अनिल देठे, संतोष वाडेकर, उमेश देशमुख, कारभारी गवळी, गुलाबराव डेरे, डॉ. संदीप कडलग, महेश नवले, विठ्ठल पवार, अमोल वाघमारे, माणिक अवघडे, सुभाष निकम, सिद्धप्पा कलशेट्टी, विलास बाबर, खंडू वाक्‌चौरे, अभिजित पाटील, राजेंद्र तुरकने यांनी म्हटले आहे.

इतर अॅग्रो विशेष
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...
मराठवाड्यातील भूजल रसातळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने...
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...