agriculture news in Marathi, Figs exhibition from 28 January in Saswad, Maharashtra | Agrowon

सासवड येथे २८ जानेवारीपासून अंजीर परिषदेचे आयोजन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जानेवारी 2018

पुणे ः अंजीर फळासाठी प्रक्रिया उद्याेगांबराेबरच निर्यातीसाठी संधी उपलब्ध व्हावी, यासाठी संशाेधन आणि विकासासाठी अंजीर परिषदेचे आयाेजन करण्यात आले आहे. अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक आणि संशाेधन संघाच्या वतीने या परिषदेचे पहिल्यांदाच आयाेजन करण्यात येत असून, २८ जानेवारी राेजी सासवड येथील काळेवाडी येथे परिषद हाेणार असून, उद्‍घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते हाेणार असल्याचे संघाचे सचिव सुरेश सस्ते यांनी सांगितले. 

पुणे ः अंजीर फळासाठी प्रक्रिया उद्याेगांबराेबरच निर्यातीसाठी संधी उपलब्ध व्हावी, यासाठी संशाेधन आणि विकासासाठी अंजीर परिषदेचे आयाेजन करण्यात आले आहे. अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक आणि संशाेधन संघाच्या वतीने या परिषदेचे पहिल्यांदाच आयाेजन करण्यात येत असून, २८ जानेवारी राेजी सासवड येथील काळेवाडी येथे परिषद हाेणार असून, उद्‍घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते हाेणार असल्याचे संघाचे सचिव सुरेश सस्ते यांनी सांगितले. 

श्री. सस्ते म्हणाले, की राज्यात सुमारे ७ हजार हेक्टर अंजिराचे क्षेत्र असून, त्यापैकी १ हजार ५०० हेक्टर क्षेत्र पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी ९० टक्के क्षेत्र पुरंदर तालुकक्यात असून, पुरंदरच्या अंजिराचे विशेष महत्त्व आहे. या अंजिराला नुकतेच भाैगाेलिक मानांकन मिळाले असून, केवळ मानांकनामुळे प्रश्‍न सुटलेले नाहीत.

अंजिरावर प्रक्रिया उद्याेगाबराेबरच निर्यातक्षम आणि टिकवण क्षमता असलेल्या अंजिराचे वाण विकसित हाेण्याची गरज आहे. यासाठी अंजीर उत्पादक संघाच्या वतीने अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र आणत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी परिषद आयाेजनाचा प्रयत्न आहे.

परिषदेमध्ये अंजीर उत्पादन व उत्पादकांच्या समस्येवर विविध तज्ज्ञ, संशाेधक, धाेरणकर्ते मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राज्य फलाेत्पादन व आैषधी मंडळाच्या वतीने परिषदेचे आयाेजन करण्यात आले असून, परिषदेला कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे उपस्थित राहणार असल्याचे संघाचे उपाध्यक्ष रामचंद्र खेडेकर यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी संपर्क 
सुरेश सस्ते (सचिव), ९८८१४१३०८९
 रामचंद्र खेडेकर,९४२१०१७६५७

इतर बातम्या
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
औरंगाबाद, जालना मतदारसंघांत शांततेत...औरंगाबाद, जालना ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
उद्रेकानंतर सोडलेले वांगीचे पाणी चार...वांगी, जि. सांगली ः दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...