पंचगंगा प्रदूषणप्रश्नी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करू ः कदम

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करू ः कदम
पंचगंगा प्रदूषणप्रश्नी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करू ः कदम

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी उपाययोजना करण्यात हयगय होत असल्याने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला.

इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पाटील माहिती देत असतानाच तुम्ही खोटे सांगत आहात. तुम्हाला प्रदूषण रोखता येत नाही. नगरपालिका चालविता का गाईचा गोठा, असे म्हणत वेळप्रसंगी तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा दमही कदम यांनी अधिकाऱ्यांना दिला. पंचगंगा नदी प्रदूषणसंदर्भात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शासकीय विश्रामगृह येथील शाहू सभागृहात बैठक झाली. त्या वेळी या बैठकीत नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, याचा आढावा कदम यांनी घेतला.

प्रथम त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना महापालिकेने काय कारवाई केली, असा प्रश्‍न केला. आयुक्त चौधरी म्हणाले, की कसबा बावडा येथील एसटीपी कार्यान्वित असून तेथे ५५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होते. दुधाळी नाल्यावरील एसटीपीची चाचणी झाली असून, दहा दिवसांत हा एसटीपी सुरू करू. बापट कॅम्प आणि लाइनबाजार नाल्याचे पाणी एसटीपीकडे वळविण्याचे काम सुरू आहे. एकूण ९० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे आयुक्तांनी सांगितले. पर्यावरणमंत्री कदम यांनी ही सर्व माहिती लिहून घेतली. त्यानंतर त्यांनी आयुक्तांची उलटतपासणी घेतली. जयंती नाल्याचे पाणी थेट नदीत मिसळत आहेत. तुम्ही सांगितलेली सगळी आकडेवारी खोटी आहे. ती फक्त कागदावरच आहे. प्रत्यक्षात मी पाहणी केली आहे. सर्व प्रदूषित पाणी थेट नदीत मिसळत आहे. यावर आयुक्‍त चौधरी तसेच जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी मंत्र्यांना पावसामुळे नाल्यात पाण्याचे प्रमाण वाढल्याने हे पाणी मिसळत असल्याचे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. पण कदम यांनी पाऊस कोठे आहे, काहीही सांगू नका. एक थेंबही पाणी नदीत मिसळणार नाही, याची दक्षता घ्या. अन्यथा थेट कारवाईला सामोरे जा, असा दमही त्यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com