agriculture news in marathi, file will re open of jalyukt fraud, Maharashtra | Agrowon

‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा उघडणार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात कोट्यवधीचा निधी हडप करणाऱ्या टोळीचा तपास करण्यासाठी दडपडलेल्या फाइल पुन्हा उघडल्या जाणार आहेत. कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी चौकशीला अनुकूलता दर्शविली आहे.

पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात कोट्यवधीचा निधी हडप करणाऱ्या टोळीचा तपास करण्यासाठी दडपडलेल्या फाइल पुन्हा उघडल्या जाणार आहेत. कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी चौकशीला अनुकूलता दर्शविली आहे.

कृषी खात्यातील सोनेरी टोळीने कंत्राटदारांच्या मदतीतून बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवाराच्या नावाखाली ३५ कोटी रुपये खर्च झाल्याचे दाखविले. यातील किती पैसा हडप केला हे अद्यापही बाहेर आलेले नाही. कृषी आयुक्तालयाने या घोटाळ्यात एकूण २४ अधिकारी व कर्मचारी अडकल्याचे मान्य करून प्रशासकीय कारवाईदेखील केली आहे. दुसऱ्या बाजूला मोकाट राहिलेल्या १३८ ठेकेदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यामुळे कृषी खात्यातील भ्रष्ट टोळीची चांगलीच कोंडी झाली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व कामे तपासण्यात आलेली नाहीत. त्यामुळे दडपून ठेवलेल्या फाइल्स पुन्हा काढाव्यात, असा आग्रह श्री. मुंडे यांनी धरला होता. त्यानुसार आता पुन्हा चौकशीला कृषी आयुक्तांनी अनुकूलता दाखविली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कृषी खात्यातील टोळीने प्रशासकीय मंजुरी न घेता तसेच अनुदान मंजूर नसतानाही पावणेसात कोटींची कामे केली आहेत. या कामांची १०० टक्के तपासणी झाल्याशिवाय पेमेंट करू नका, असे आदेश कृषी आयुक्तालयाने दिलेले होते. मात्र, आदेश डावलून बनावट व्हाउचर्सच्या साह्याने पेमेंट केले गेले आहे. कृषी संचालकांनी काढलेल्या एका पत्रानुसार (क्रमांक २०८७, मृसं २०१८) संशयास्पद बिले अदा न करण्याची सूचना केलेली असतानाही कोट्यवधी रुपये काढण्यात आलेले आहेत. या बिलांचीदेखील पडताळणी केली जाणार आहे. 

जलयुक्त शिवारात पहिल्या टप्प्यात ८८३ कामे केल्याचे दाखविण्यात आलेले आहे. त्यातील ३०७ कामांची तपासणी झाली असता, चार कोटींचा घोटाळा बाहेर निघाला. मात्र, उर्वरित कामे न तपासल्यामुळे भ्रष्ट टोळीने सुटकेचा निःश्वास टाकला होता. आयुक्तांनी आता या टोळीला पुन्हा घाम फोडला आहे. 

‘‘जलयुक्त शिवार घोटाळ्यात राजकीय नेते, बडे कृषी अधिकारी व ठेकेदारांचा समावेश असल्यामुळे चौकशी संथ गतीने सुरू आहे. कृषी अधिकाऱ्यांनी पैसे लाटण्यासाठी २३३ कामे प्रशासकीय मान्यता न घेताच ६ कोटी ८५ लाखांची बिले मजूर केली आहेत,’’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले. जलसंधारण व पाणलोटाच्या नावाखाली कृषी खात्यात सर्वात जास्त पैसा हडप केला जातो. बीड घोटाळ्यात माती नालाबांध कामांसाठी मूळ कामांचे तुकडे पाडून २-३ लाखांचे इस्टिमेट तयार करण्यात आले आहे, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

‘पाणलोटाची कामे म्हणजे आमचे एटीएम’
"पाणलोट, जलसंधारण, मृदसंधारणाची कामे ही आमच्यासाठी एटीएमसारखी आहेत. आम्ही हवे तेव्हा कितीही पैसे या एटीएममधून काढू शकतो,’’ अशी चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यासाठी मृदसंधारण, जलसंधारणाची कामे आपल्या अखत्यारित ठेवण्याचा कायम आटापिटा कृषी अधिकाऱ्यांचा चालतो. ‘‘जमिनीची धूप थांबवणे किंवा भूगर्भात पाणी नसल्याचे सांगत मोठ्या प्रमाणात निधी आणला जातो. काही मोजकी कामे चकाचक करून प्रत्यक्षात ६०-७० टक्के निधीत टक्केवारीने पैसे लाटण्याची पद्धत केल्या काही वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी गावापासून मंत्रालयापर्यंत मोठी साखळी आहे,’’ अशी धक्कादायक माहिती जलसंधारण विभागाच्या सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...
'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...
साखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...
कापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...
कृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...
धुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
दुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...
आणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...
मेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...
सिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...