agriculture news in marathi, filed application status for solapur market committee election, maharashtra | Agrowon

सोलापूर बाजार समितीच्या १८ जागांसाठी तब्बल ३९३ अर्ज
टीम अॅग्रोवन
रविवार, 3 जून 2018

सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शनिवारी (ता. २) शेवटच्या दिवशी १८ जागांसाठी तब्बल ३९३ अर्ज दाखल झाले. सोमवारी (ता. ४) उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, मंगळवारी (ता. १९) उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीचे नेमके चित्र त्याचवेळी स्पष्ट होणार आहे.

सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शनिवारी (ता. २) शेवटच्या दिवशी १८ जागांसाठी तब्बल ३९३ अर्ज दाखल झाले. सोमवारी (ता. ४) उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, मंगळवारी (ता. १९) उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीचे नेमके चित्र त्याचवेळी स्पष्ट होणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रमुख दिग्गजांमध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर सौ. शोभा बनशेट्टी, माजी सभापती दिलीप माने, महादेव चाकोते, माजी आमदार रतिकांत पाटील, शिवशरण पाटील, प्रकाश वानकर, सुरेश हसापुरे, गोपाळराव कोरे, बाळासाहेब शेळके आदींचा समावेश आहे. 

शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ त्यासाठी होती. त्यामुळे सकाळपासूनच कार्यकर्ते आणि नेत्यांनी आवार भरून गेले होते. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच अर्जांची संख्या तब्बल ४००च्या घरात गेली आहे. भाजप- शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस यापैकी कोणत्याही पक्षाने अद्याप आपल्या पॅनेलची घोषणा केलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचे लक्ष आता नेत्यांच्या भूमिकेकडे लागले आहे. 

पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे स्वतंत्र पॅनेल करून लढण्याच्या तयारीत असल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही त्यांना तोंड देण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. पालकमंत्री देशमुख कुंभारी मतदारसंघातून लढणार आहेत. त्यांना शह देण्यासाठी आता सहकारमंत्री देशमुख यांनी महापौर शोभा बनशेट्टी यांना उतरवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.

येत्या दोन दिवसांत उमेदवारांचा आढावा घेऊन सहकारमंत्री देशमुख पॅनेलची घोषणा करतील. दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र अद्यापही शांतता आहे. पण बहुतांश नेते, कार्यकर्त्यांनी अर्ज भरले आहेत. बाजार समितीचे तत्कालीन सभापती दिलीप माने यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळावर गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे ही मंडळी अर्ज कसा भरणार, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. पण सूचकामार्फत अर्ज भरता येईल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने श्री. माने, श्री. चाकोते यांच्या सूचकांनी त्यांचे अर्ज भरले.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत ३७ अर्जांची विक्री झाली. पण अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. मंगळवारी (ता. ५) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सोमवार आणि मंगळवारी असे दोन दिवस सर्वाधिक गर्दी होण्याची शक्‍यता आहे.

पहिल्या दोन दिवसांत कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल झालेला नाही. प्रत्येक राजकीय पक्ष विविध गणांत प्रतिस्पर्ध्याचा कोणता उमेदवार येतो, याची चाचपणी करून आपल्या गटाचा उमेदवार ठरवत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना अशी तिहेरी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. पण ऐनवेळी काय निर्णय होईल, हे सांगता येत नाही.

इतर ताज्या घडामोडी
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...