agriculture news in Marathi, filed the complaint against 24 people in tur procurement scam on ansingh center, Maharashtra | Agrowon

अनसिंग केंद्रावरील तूर घोटाळ्यात २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

वाशीम : नाफेडच्या माध्यमातून अनसिंग येथील केंद्रावर विदर्भ कृषी प्रक्रिया व पणन सहकारी संस्थेच्या संचालकांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. व्यापाऱ्यांचा माल मोजून घेतल्याप्रकरणी संस्थेचे सर्व संचालक व काही व्यापाऱ्यांविरुद्ध अनसिंग पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २६) रात्री दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. 

वाशीम : नाफेडच्या माध्यमातून अनसिंग येथील केंद्रावर विदर्भ कृषी प्रक्रिया व पणन सहकारी संस्थेच्या संचालकांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. व्यापाऱ्यांचा माल मोजून घेतल्याप्रकरणी संस्थेचे सर्व संचालक व काही व्यापाऱ्यांविरुद्ध अनसिंग पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २६) रात्री दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. 

गतवर्षीच्या रब्बी हंगामानंतर शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत तूर खरेदी सुरू केली. अनसिंग येथील उपबाजाराची तूर खरेदी करणारी एजन्सी म्हणून विदर्भ कृषी प्रक्रिया व पणन सहकारी संस्थेची नियुक्ती केली होती. तूर खरेदी सुरू असताना योगेश बद्रीनारायण राठी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे. तक्रारीमध्ये विविध बाबींबरोबरच नाफेडने नियुक्त केलेल्या एजन्सीच्या वही खात्यामध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या मर्जीतल्या कथित शेतकऱ्यांची चौकशी करावी, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्री करून तुरीचे धनादेशसुद्धा नेल्याची बाब नमूद केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने या प्रकरणाची चौकशी केली. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. या चौकशीमध्ये लाखोंच्या रकमा एकाच खात्यात वारंवार भरल्या गेल्या. या प्रकरणी चौकशी अधिकारी ओमप्रकाश साळुंखे यांनी अनसिंग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. 

या फिर्यादीवरून १७ ऑक्टोबरला संस्थेचे व्यवस्थापक बाबाराव दर्याजी लोथे, व्यापारी नंदकिशोर भगवानदास सारडा, प्रदीप विष्णूदास बजाज, रतनलाल मदनलाल हुरकट यांच्यासह एका शेतकऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हरीश सारडा यांनी गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून इतर संचालकांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी गोदामातील तुरीची पाहणी केल्यानंतर गुरुवारी (ता. २६ ) गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावरून रात्री उशिरा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अनसिंग पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग ठाकरे, व्यवस्थापक बाबाराव लोथे, संचालक रामराव घोलप, केशव ठाकरे, माणिक सातव, प्रकाश दंडे, माधव ठाकरे, विजय सूर्यवंशी, विष्णू काटेकर, विठ्ठल गोटे, राजेंद्र सावरे, माधव बोंद्रे, विश्‍वनाथ रंणखाब, सखाराम थोरात, महादेव ढोके, अनुसया ठाकरे, कांताबाई मुसळे, लक्ष्मण मुसळे, रमेश जाधव, नंदू सातव, सुरेश दंडे, शाम पाले, गंगाराम चौधरी, गणेश चौधरी यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले अाहेत.

इतर बातम्या
बारामतीतील विकासाचे काम देशातील...बारामती : ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सामान्य...
सुकाणू समितीच्या कार्यकारिणीची जवळगाव...अंबाजोगाई, जि. बीड : शेतकरी संघटना व सुकाणू...
मराठवाड्यात पीककर्ज वितरण कासवगतीनेऔरंगाबाद : आढावा बैठकींचा सपाटा, काही ठिकाणी...
‘बोंड अळी व्यवस्थापनाचा महाराष्ट्र...परभणी : कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या...
रताळ्याच्या पिठापासून ‘अ’...टांझानियातील एका खासगी कंपनीने ‘अ’ जीवनसत्त्वांनी...
पोकराअंतर्गत ८४ गावांत आंतरपीक...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत...
पीककर्ज वाटपाचा टक्का वाढेनाअकोला  : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या...
कांदा बाजारात दरवाढीचे संकेतनाशिक : राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये...
कुलगुरू भट्टाचार्य यांचा राजीनामा अखेर...पुणे : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
नाशिक बाजार समिती संचालकांवर गुन्हे...नाशिक : आचारसंहिता काळात शासकीय वाहनाचा वापर...
उपराष्ट्रपती आज बारामतीतबारामती ः उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू शुक्रवारी (...
‘प्रलंबित वीजजोडणीसाठी मोबाईल नोंदणी...मुंबई : मार्च-२०१८ अखेर राज्यात...
पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन...पुणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या...
ऊस उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान...पुणे ः सहकारी साखर कारखाने शक्तिस्थळे असून,...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी बहुस्तरीय...पुणे ः शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन,...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; चार...सातारा : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने...
कापूस बाजारात भारताला संधीन्यूयाॅर्क ः चालू कापूस हंगामात पिकाला फटका...
मॉन्सून सक्रिय होण्यास प्रारंभ पुणे  ः अरबी समुद्र आणि हिंदी महासागर...
शेतकऱ्यांनी अपघात विमा योजनेचा लाभ...सातारा : राज्यातील सातबारा उताराधारक...
थकली नजर अन्‌ पाय...औरंगाबाद : घोषणा झाली, पण काय व्हतंय कुणास ठाऊक,...