बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कृषी अधिकाऱ्यावर गुन्हा

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कृषी अधिकाऱ्यावर गुन्हा

वाशीम ः नोकरीवर असताना ३१ लाख ७५ हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमविण्याच्या आरोपाखाली सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या फिर्यादीवरून वाशीम शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार दिलीप केशवराव देशमुख हे कृषी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले असून, त्यांनी गैरकायदेशीर मार्गाने मालमत्ता जमविल्याची तक्रार करण्यात आली होती. याची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गोपनीय पद्धतीने चौकशी केली. त्यानंतरही उघड चौकशी करण्यात आली. देशमुख हे १९८० मध्ये कृषी पर्यवेक्षक या पदावर कृषी विभागात नोकरीला लागले होते. ते जून २००९ मध्ये कृषी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. नोकरीच्या काळात त्यांनी स्वतः व पत्नीच्या नावे अपसंपदा जमविली असल्याचा अर्ज दाखल झाला होता. त्याबाबत झालेल्या चौकशीत उत्पन्नाच्या ४४ टक्के अधिक पैसा जमविल्याचे चौकशीत पुढे आले. या प्रकरणी बुधवारी (ता. २५) देशमुख यांच्यासह त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com